पुणे

झेडपीच्या ६२ विद्यार्थ्यांची ‘नवोदय’च्या परीक्षेतून निवड

CD

पुणे, ता. २३ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी झालेल्या पी.एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ८० पैकी ६२ जागांवर पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) जिल्हास्तरावर सामाईक परीक्षा घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ८० जागांसाठी परीक्षा दिली होती.
पी.एम. श्री जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप येथे इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत निवासी स्वरूपात शिक्षण घेता येणार आहे. येथे सीबीएसई संलग्न अभ्यासक्रमासह पूर्णतः मोफत शिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. तालुकानिहाय निवडीत खेड तालुका अव्वल ठरला असून तेथील २१ विद्यार्थी निवडले गेले. आंबेगावमधील १३ आणि शिरूरमधील १० विद्यार्थ्यांनीही यश मिळवले. नियमित सराव, अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपेढी तयार करणे, अतिरिक्त तास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे जिल्हा परिषद शाळांना हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.
याबाबात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षांसाठी केलेले नियोजन, सराव परीक्षा आणि शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांच्या सहभागातून उभारलेली गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ यामुळे हे यश मिळाले आहे. या कामगिरीत सातत्य ठेवण्याचा पुढेही प्रयत्न राहील.’’

पुणे जिल्हा परिषद शाळांतील गुणवत्ता या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद नेहमीच आग्रही राहील. नवोदय परीक्षेतील हे यश खऱ्या अर्थाने मातृभाषेतून मिळालेल्या शिक्षणाचे यश आहे. शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या कष्टांमुळे एवढे मोठे यश शक्य झाले.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT