पुणे

चाकण परिसरात परप्रांतियांकडून धुळवडीनिमित्त रंगाची उधळण

CD

चाकण, ता. ३ : चाकण व औद्योगिक वसाहत परिसरात यंदा धुळवडीचा उत्सव मोठ्या उत्साहात परंपरेनुसार साजरा करण्यात आला. परप्रांतीय कामगारांनी एकमेकावर रंगाची उधळण करत रंगाने भरलेले फुगे टाकत धुळवडीचा आनंद साजरा केला.
चाकण औद्योगिक वसाहतीमुळे देशभरातून येथे स्थायिक झालेल्या परप्रांतीय कामगारांनी रंग एकमेकावर टाकून जल्लोष केला. सकाळपासूनच विविध चौक, पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्ग तसेच कामगार वसाहतींमध्ये रंगांची उधळण सुरू होती. महिला, तरुणी ही सामील झाल्या होत्या. ढोल-ताशे, डफडी वाद्यांच्या गजरात तरुणाईने नाचत-गाणी गात एकमेकांना रंग लावून धुळवडीचा आनंद लुटला.
गेल्या काही वर्षांत चाकण औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित झाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, झारखंड आदी राज्यांतील कामगार मोठ्या संख्येने येथे वास्तव्यास आहेत. धुळवडीत परप्रांतियांनी पारंपरिक पद्धतीने सण साजरा करत स्थानिकांनाही सहभागी करून घेतले.

दरम्यान, पोलिस प्रशासनानेही धुळवडी दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मुख्य चौकांत पोलिस तैनात करण्यात आले होते. दरम्यान, एका दुचाकीवर तीन-चार तरुण बसून फिरत होते. त्यांच्यावर वाहतूक पोलिस विभागाने कारवाई केली. धुळवडीनिमित्ताने चाकण व परिसरात शांत वातावरण होते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, संजय सोळंके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : राज्यभरात उष्माघाताच्या 115 रुग्णांची नोंद

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT