पुणे

टंचाईवर उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश

CD

पुणे, ता. ७ : ‘‘जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच टंचाई निवारणासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक लवकरच घेण्यात येणार आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी मंगळवारी दिली.

टंचाई निवारणाच्या बैठकीसह खरीप हंगामाची आढावा बैठक देखील घेतली जाणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान, सकाळने ‘टंचाईच्या झळा’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. ‘‘टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, बिघडलेल्या यंत्रणांची तातडीने दुरुस्ती करणे, पर्यायी स्रोतांचा शोध घेणे आणि गरजेनुसार आपत्कालीन उपाययोजना तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावातील परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन स्थानिक पातळीवर तत्काळ निर्णय घेण्यासही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे,’’ जगदाळे यांनी सांगितले.
जगदाळे म्हणाले, ‘‘आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन तालुकानिहाय तसेच जिल्हास्तरीय आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीत पाणी उपलब्धता, शेतीसाठी नियोजन, तसेच संभाव्य अडचणी यावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यासाठीचे नियोजन लवकरच जाहीर केले जाईल. जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन काम करत असून, विविध विभागांमध्ये समन्वय साधून काम केले जाईल,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टंचाई निवारणासाठीच्या प्रमुख उपाययोजना
- विंधन विहिरींची नवीन कामे तसेच जुन्या विहिरींची दुरुस्ती
- नळपाणी योजनांची दुरुस्ती व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करणे
- टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
- आवश्यकतेनुसार खासगी विहिरी अधिग्रहित करणे
- विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्याची कामे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT