पुणे

करदरवाढ नाही; नागरिकांना दिलासा

CD

पिंपरी, ता. १० ः आर्थिक वर्ष २०२६-२७ एक एप्रिलपासून सुरू झाले आहे. या नव्या वर्षात पिंपरी चिंचवडकरांना महापालिका प्रशासनासह नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी मिळकतकरासह पाणीपट्टीत वाढ न करता दिलासा दिला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच मिळकतकर आणि पाणीपट्टीची देयके वाटप सुरू केली आहेत.
महापालिकेने २०१६-१७ मध्ये मिळकतकर आणि पाणीपट्टी वाढ केली होती. आता दहा वर्ष झाली आहेत. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात मिळकतकर व पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव प्रशासकीय काळात तयार केला होता. कारण, विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक लांबल्यामुळे १४ मार्च २०२२ पासून सहा फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्थात तब्बल चार वर्ष प्रशासक म्हणून आयुक्त कारभार पहात होते. या काळात कोणतीही करवाढ केली नव्हती. मात्र, गेल्या वर्षी प्रस्ताव तयार केला होता. तो २०२६-२७च्या अर्थसंकल्पीय सभेत ठेवण्यात येणार होता. दरम्यान, महापालिका निवडणूक होऊन लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती सत्ता आली आहे. त्यांच्यासमोर करवाढीचा प्रस्ताव चर्चेस ठेवला होता. मात्र, प्रशासकीय काळात करवाढ केली नाही, मग आमच्या काळात का? असा प्रश्‍न उपस्थित करत लोकप्रतिनिधींनी करवाढ करण्यास नकार दिल्याने करवाढ झालेली नाही.

आयुक्तांकडून दरपत्रक जाहीर
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ९९ नुसार कर व करेत्तर बाबींचे दर २० फेब्रुवारीपर्यंत ठरवणे आवश्यक आहे. पण, फेब्रुवारीमध्ये स्थायी समिती नसल्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचे कर व करेत्तर बाबींचे दरपत्रक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एक एप्रिल रोजी जाहीर केले आहे.

मालमत्तांचे करयोग्यमूल्य (टक्के)
सामान्य कर टप्पा / निवासी / निवासेत्तर
१,००० ते १२,००० / २४ / २७
१२,००१ ते ३०,००० / २७ / ३०
३०,००१ पासून पुढे / ३५ / ३७
(निवासी व बिगरनिवासी मालमत्ता कराच्या दरात अनुक्रमे साफसफाईकर ५ व ६ टक्के, शिक्षण उपकर ४ व ५ टक्के आणि दोघांसाठी अग्निशामक कर २ टक्के आहे)

मालमत्तानिहाय वेगवेगळे कर
मॉल्स, लॉजिंग, बोर्डिंग, मंगल कार्यालये, सभागृह, रुग्णालये, हॉटेल्स, कॅंटीन, रेस्टॉरंट अशा मालमत्तांना करयोग्‍य मूल्यावर वृक्षकर एक टक्का, मलप्रवाह सुविधा लाभकर पाच टक्के, पाणीपुरवठा लाभकर पाच टक्के व रस्ता कर तीन टक्के आहे.

मराठी चित्रपटांना करमाफी
करमणूक करही जाहीर झाले आहेत. यातून मराठी चित्रपटांना करमाफी दिली आहे. मात्र, अन्य चित्रपटांसाठी ५०० आसन क्षमतेपर्यंत प्रतिदिन २५० रुपये, वातानुकूलित थिएटर प्रती स्क्रीन प्रतिदिवस ३५० रुपये, कुस्त्यांसाठी प्रतीखेळ ५० रुपये आणि नाटक, सर्कस, तमाशा, जलसे प्रतिप्रयोगास आणि या व्यतिरिक्त कार्यक्रमांच्या प्रयोगास प्रतिदिवस १०० रुपये करआकारणी केली जाणार आहे.

सामान्य करातील सवलती (जून अखेरपर्यंत भरल्यास)
- थकबाकीसह संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास ः ५ टक्के
- फक्त महिलांच्या नावे निवासी मालमत्ता असल्यास ः ३० टक्के
- स्वातंत्र्य सैनिक वा त्यांच्या पत्नीच्या नावे निवासी मालमत्ता असल्यास ः ५० टक्के
- ग्रीन बिल्डिंग रेटिंगमधील गृहप्रकल्प ः १ ते १५ टक्केपर्यंत

निरंतर (वर्षभर) सामान्य करसवलत (टक्क्यांत)
- ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्ती ः ५० टक्के
- स्वतःचे ई-व्ही चार्जिंग स्टेशन असल्यास ः २ टक्के
- सलग तीनवर्षे मालमत्ता कर भरणाऱ्यास ः २ टक्के
- स्वतःहून मालमत्ता नोंदणी केल्यास ः ५ टक्के
- रेडझोनमधील मालमत्तांचा कर थकबाकीसह भरणारे ः ५० टक्के

शंभर टक्के करसवलत
- शौर्यपदक विजेते सैनिक
- अविवाहित शहीद सैनिक
- माजी सैनिक व सैनिकाची विधवा पत्नी
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal Baramati : 'उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर...', हर्षवर्धन सपकाळांचा पवारांच्या बालेकिल्ल्यात इशारा

RR vs RCB Weather Update: विराट कोहली- वैभव सूर्यवंशी, संघर्षावर पावसाचं सावट; RR ने MIला जसे धुतले, तसेच RCBला चोपावे लागणार

Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

Latest Marathi News Live Update : TVK प्रमुख आणि अभिनेता विजय कराईकुडी येथे निवडणूक प्रचार करत आहेत

Khaby Lame Divorce: नंबर 1 टिकटॉकरचा घटस्फोट चर्चेत! 20 मिलियन डॉलर संपत्ती, पण मालकी कुणाची? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT