

SRH vs RR | IPL 2026
Sakal
IPL 2026 Eliminator SRH vs RR news: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आज (ता. २७) मुल्लानपूर येथे आयपीएल २०२६ मधील ‘एलिमिनेटर’ लढत रंगणार आहे. या लढतीतील पराभूत संघाचे आव्हान येथेच संपुष्टात येईल.
या लढतीत विजयी होणारा संघ ‘क्वालिफायर टू’ लढतीत खेळणार आहे. या लढतीत विजयी होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असेल. हा विजयी संघ ‘क्वालिफायर वन’ लढतीतील पराभूत संघ गुजरात टायटन्सशी दोन हात करेल.