पुणे

पुरंदर, दौंड, आंबेगावातील पर्यटक दुबईत सुखरूप

CD

सासवड/केडगाव/मंचर, ता. ३ : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई येथील विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील शेकडो नागरिक तेथे अडकले आहेत. यामध्ये पुरंदर, दौंड व आंबेगाव तालुक्यातील नागरिकांचा समावेश असून सर्वजण सध्या सुखरूप असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.

पुरंदर तालुक्यातील खळद येथील योगेश साहेबराव कामथे हे पत्नी कवितासह २६ फेब्रुवारी रोजी दुबई सहलीसाठी गेले होते. त्यांच्या सोबत बेलसर येथील नीलेश कृष्णा जगताप, मीनाक्षी जगताप व अभय जगताप हेही होते. सुरुवातीला सहल आनंदात सुरू असताना अचानक युद्ध सुरू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि विमानसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे ते दुबईत अडकून पडले आहेत. कामथे यांनी सोशल मीडियावरून आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, कंपनीकडून निवास, भोजन व सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जात आहे; मात्र बाहेर शांतता असली तरी मनात अस्वस्थता आहे. “जगात कितीही सुंदर शहरं असली तरी मायदेशाची माती आणि आपली माणसं अनमोल असतात,” असे भावुक उदगार त्यांनी काढले. विमानसेवा सुरू होताच मायदेशी परतण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

‘केअर हेल्थ इन्शुरन्स’ या आरोग्य विमा कंपनीचे सुमारे ३७० प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी दुबईत गेले होते. त्यात दौंड तालुक्यातील धनंजय काळे, अनिकेत ताकवणे (पारगाव), गणेश व श्रेयश बारवकर (केडगाव), राजाराम काकडे (बोरीभडक), विजय व अमृता थोरात (वाळकी), संपत बनकर (कुरकुंभ), तसेच संतोष राऊत (इंदापूर) व सूर्यकांत हगारे (भिगवण, ता. इंदापूर) यांचा समावेश आहे. हे सर्व प्रतिनिधी सध्या एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून कंपनी व संबंधित प्रशासन पुढील विमानव्यवस्थेबाबत प्रयत्न करत आहेत. तर भारतीय दूतावासाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दुबईतील इतर व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याचे गणेश बारवकर व धनंजय काळे यांनी सांगितले. आमदार राहुल कुल यांच्यासह कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्कात आहेत.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहेत. ज्यांना मदतीची गरज वाटते, त्यांनी #Mahahelpline व व्हॅाटसअॅप क्रमांक +९७१५०३६५४३५७ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यातील अवनंदिनी संजय कसाब (अवसरी खुर्द), सविता गंगाराम बंगाळ (चांडोली बुद्रुक), लता सुहास फलटणे (कळंब) आणि स्मिता मारुती धिमते (लौकी) या चार बहिणी १९ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला गेल्या होत्या. युद्धस्थितीमुळे त्यांचे दुबई–पुणे परतीचे उड्डाण रद्द झाले. त्या सध्या दुबईतील नातेवाइकांच्या निवासस्थानी सुरक्षित आहेत. इंटरनेट सेवा खंडित झाल्याने काही काळ संपर्क तुटला होता; मात्र त्या सुखरूप असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.या बहिणींचे भाचे गौरव धीमते हे दुबईमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्या निवासस्थानी या बहिणीचा मुक्काम आहे. त्यांचे गुरुवारी (ता. ४) दुबई–पुणे परतीचे विमान तिकीट निश्चित होते. मात्र, युद्धाची तीव्रता वाढल्याने दुबईहून भारतात येणाऱ्या विमानसेवा बंद करण्यात आल्या. परतीची पुण्याची तिकिटे निश्चित असून त्या सोमवारी (ता. ९) पुणे विमानतळावर पोहोचणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांना भारतात परत आणण्यासाठी भारतीय दूतावास यांच्याकडून नियोजन सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे.दरम्यान, माझी पत्नी नंदिनी कसाब व तिच्या तिन्ही बहिणी सुखरूप आहेत. नातेवाईक व मित्रपरिवाराने काळजी करू नये, असे संजय कसाब यांनी सांगितले.

मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना..
कंपनीने विमानसेवा सुरू होताच तत्काळ मायदेशी पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, सध्या प्रत्येक क्षण जड जात असून, ''देवा, लवकरात लवकर विमानसेवा सुरू होऊ दे आणि आम्हाला सुखरूप मायदेशाच्या कुशीत पोहोचू दे, अशी प्रार्थना कामथे यांनी खळदसह संपूर्ण पुरंदरवासीयांच्या वतीने केली आहे.
KED26B04247, SWD26B06498, MAC26B15330

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT