अविनाश ढगे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ ः इराण-इस्राईल संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशांमधून होणाऱ्या आयात-निर्यातीला फटका बसला आहे. त्यामुळे या संघर्षाचा पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) उद्योगांवर परिणाम झाला असून उद्योजकांचे करोडोंचे नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक १४१ मोठे प्रकल्प आणि ८५ हजार २५३ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम सुरु आहेत. यामध्ये वाहन निर्मिती, औषध निर्मितीसह इतर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. वाहन निर्मितीचे हब अशी पुणे जिल्ह्याची ओळख निर्माण झाली असून दुचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहन निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. येथून वाहने, अभियांत्रिकी वस्तू आणि औषधांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
संघर्षामुळे अनेक कंपन्यांच्या मोठ्या ऑर्डर रद्द झाल्या असून उत्पादन थंडावले आहे. निर्यातीसाठी पाठवलेला तयार मालाचे कंटेनर उरणमधील जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. उद्योगांवर मंदीचे सावट पसरले असून युद्धजन्य परिस्थिती आणखी आठ दिवस कायम राहिल्यास कच्च्या मालाची कमतरता जाणवणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. याचा दूरगामी परिणाम होणार असल्याचा अंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
----------
एमआयडीसीतून या वस्तूंची आयात-निर्यात
--
निर्यात
- वाहने
- फॅब्रिकेशन
- औषधे
- अभियांत्रिकी वस्तू
- वैद्यकीय साहित्य
- पेट्रोकेमिकल्स
---------
आयात
- वाहनांचे सुटे भाग
- ॲल्युमिनियम
- पॉलिमर
- पेट्रोकेमिकल्स
----------
कोणत्या उद्योगांवर परिणाम ?
- वाहन निर्मिती
- कृषीआधारित उत्पादने
- औषध निर्मिती
- अभियांत्रिकी
- रिअल इस्टेट
- वस्त्रोद्योग
- प्लास्टिक
------------
काय परिणाम होणार ?
- इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता
- कच्च्या मालाचा तुटवडा
- ऑर्डर रद्द होऊन उत्पादन थंडावेल
- डिलीव्हरीचा कालावधी लांबेल
- मालवाहतुकीचे दर वाढतील
- कंटेनर गेले किंवा आले नाही तर कच्च्या मालाची कमतरता जाणवेल
-------------
इंधनाच्या किमती वाढल्या की सर्वच वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भिती उद्योजकांमध्ये आहे.
- दिलीप बटवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.