वडापुरी, ता. ५ : येथे बारावीची परीक्षा देत असलेल्या १७ वर्षीय जगदीश महादेव चव्हाण या विद्यार्थ्याने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) घडली.
याबाबत महादेव चव्हाण यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. चव्हाण हे शेतात गेल्यानंतर त्यांची पत्नी सुनीता या संत तुकाराम बीज असल्याने गावातील श्रीनाथ मंदिरात कीर्तनाला गेल्या होत्या. तर, मुलगा जगदीश बारावीचा पेपर असल्याने घरीच अभ्यास करीत बसला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास घराच्या शेजारील मंगेश माने यांनी फोनवरून ही घटना कळली. सुनीता यांनी कीर्तन संपवून घरी आल्यानंतर दरवाजा उघडला असता, पत्र्याच्या अँगलला जगदीशने दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे पाहिले. यानंतर त्याला इंदापुरातील खासगी रुग्णालयात आणले. तेथून उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे सांगितले. दरम्यान, जगदीश चव्हाण या शाळकरी मुलाने बारावीची परीक्षा सुरू असताना अचानक गळफास घेऊन आत्महत्या केल्याने वडापुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदापूर पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.