पुणे

‘राष्ट्रवादी’चा १० ठिकाणी गजर

CD

पुणे, ता. ९ : जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदांसाठी सोमवारी (ता. ९) झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले. दहा पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती झाले आहेत. तर, प्रत्येकी एका ठिकाणी भाजप, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सभापती झाले आहेत. भोरमध्ये सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडीसाठी चिठ्ठी काढली, त्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादीला दोनही पदे मिळाले.
जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक झाली. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. त्यामध्ये सर्वाधिक ९० सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले. त्यानंतर सोमवारी सभापती, उपसभापतींची तेरा पंचायत समितीमध्ये निवडणूक झाली. त्यामध्ये सात ठिकाणी महिला सभापती, तर चार महिला या उपसभापती झाल्या आहेत. राष्ट्रवादीने बारामती, हवेली, पुरंदर, राजगड, मुळशी, शिरूर, मावळ, आंबेगाव, इंदापूर आणि भोर या दहा पंचायत समित्यांवर सत्ता स्थापन करत जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात आपली पकड कायम ठेवली. तर, दौंड पंचायत समितीमध्ये भाजपचे आठ सदस्य विजयी झाले होते. दौंडमध्ये सभापती आणि उपसभापती दोघेही भाजपचे झाले आहेत. तर, जुन्नर पंचायत समितीवर शिवसेनेने बाजी मारली. जुन्नरमध्ये शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका सदस्याने मदत केली. त्या बदल्यात त्यांना उपसभापतिपद मिळाले. तर, खेड पंचायत समितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सभापती, उपसभापती झाले आहेत.

थोपटेंना नशिबाचीही हुलकावणी
भोर विधानसभा मतदारसंघातील तीनही पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे सभापती विजयी झाले. भोर पंचायत समितीतील सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांसाठी चिठ्ठी काढावी लागली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आल्याने समान मते पडल्याने चिठ्ठी काढण्याची वेळ आली. दोनही पदांसाठी चिठ्ठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने निघाल्याने भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे माजी आमदार संग्राम थोपटे यांना भाजपची सत्ता स्थापन करता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक उपसभापती झाला आहे. मुळशी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आणि भाजपचा एक सदस्य विजयी झालेले आहेत. येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नावावर अधिकृतपणे मुळशी तालुक्यात एकमेव उपसभापतिपद मिळाले आहे. राजगडमध्ये बहुमत असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे दोनही पदे राष्ट्रवादीकडे आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

Sim Card Rules : रिचार्ज न केल्यास सिमकार्ड किती दिवसांनी बंद होतं? नवा नियम आहे खूपच फायद्याचा

SCROLL FOR NEXT