पुणे

पुणे- कोलाड रस्त्याचे रखडलेले काम सुरू

CD

पिरंगुट, ता. ८ : पुणे- कोलाड महामार्गाच्या रखडलेल्या बांधकामाला अखेर मूहूर्त सापडला असून प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे. बीएमसी या कंत्राट कंपनीने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्ती व सिमेंट कॉंक्रिटमधील पक्क्या बांधणीला सुरवात केली आहे. कंपनीने सध्या सुतारवाडी येथील सुमारे आठशे मीटर लांबीच्या अपुऱ्या लेनचे काम हाती घेतले आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी असलेल्या या रस्त्याच्या अपुऱ्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.
सुतारवाडी येथील रस्त्यावर सर्वाधिक अपघात होत होते. येथील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या तीव्र वळणावर वाहतूक कोंडी आणि अपघात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने याच ठिकाणच्या रस्त्याचे बांधकाम तातडीने हाती घेतलेले आहे.
याबाबत या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या बीएमसी इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीचे या महामार्गाचे काम पाहणारे व्यवस्थापक वैभव थोरवे यांनी सांगितले की, सुतारवाडीतील अपघात आणि तीव्र वळणाचा विचार करून तेथील कामाला प्राधान्य दिलेले आहे. प्रत्येक दिवशी किमान शंभर मीटर अंतराचे बांधकाम होईल. त्यामुळे येथील आठशे मीटर लांबीच्या रस्ता बांधकामाला आठ दिवस लागतील. त्यानंतर आठवडाभरात तेथील रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. त्यानंतर पुढील अन्य ठिकाणचे काम हाती घेण्यात येईल.
दरम्यान, समक्ष उभे राहून या रस्त्याचे खड्डे बुजविण्याच्या कामी पौड पोलिसांनी मोठी मदत केली. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून पौड पोलिसांनी बीएमसी या कंपनीला जागोजागचे खड्डे बुजविण्याची सूचना केली होती. त्यानुसार कंपनीने लवळे फाटा, पिरंगुट पोलिस मदत केंद्रालगतच्या ओढ्यावरील पुलाचा रस्ता, सुतारवाडी तसेच घोटावडे फाटा येथील रस्त्यावर तातडीने खडी व क्रशर वापरून खड्डे बुजविले आहेत. कंपनीने तातडीने केलेले सहकार्य लक्षात घेऊन पोलिसांनीही रात्रपाळी करून खड्डे बुजविण्याच्या कामाला सहकार्य केले. खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिस राजेश गायकवाड, पोलिस मित्र प्रशांत शिंदे यांनी सहकार्य केले. त्यामुळे आज शनिवार हा सुट्टीचा दिवस आणि पर्यटकांची आणि वाहनांची रेलचेल असूनही वाहतूक नेहमीपेक्षा सुरळीत चालू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT