पुणे

निळकंठेश्वराच्या शिवपिंडीला अभिषेक

CD

पिरंगुट, ता. २१ : डावजे (ता.मुळशी) येथील श्रीक्षेत्र निळकंठेश्वरला श्रावणी सोमवारच्या महोत्सवाला उत्साहास प्रारंभ झाला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवपिंडीला फुलांची आकर्षक सजावट केली होती. भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग लावायला सुरुवात केली होती.
श्री निळकंठेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त शिवदास ऊर्फ बाळासाहेब शंकरराव सर्जे यांच्या हस्ते आज (ता.२१) पहाटे मंदिरातील शिवपिंडीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी दर्शन घ्यायला सुरवात झाली. दरम्यान, श्रावणमासानिमित्त स्वयंभू श्री निळकंठेश्वर पालखी सोहळ्याच्यावतीने अखंड श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा पार पडला. त्यानिमित्त रोज पहाटे काकड आरती, श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण, संत तुकाराम गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर आदी कार्यक्रम पार पडले. त्यानिमित्त ताथवडे येथील कीर्तनकार मारुती महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत महाराज तापकीर, बाबूलाल महाराज कदम व कान्होपात्रा पवार यांची प्रवचने तसेच देविदास महाराज साखरे, वसंत महाराज भालेराव आणि डॉ. बाबासाहेब महाराज कुटे यांचे कीर्तन झाले. ग्रंथदिंडी प्रदक्षिणा झाल्यावर मारुती महाराज पवार यांचे काल्याचे कीर्तन झाले.

02305

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT