पुणे

पिरंगुट घाटातील खड्ड्याने १६ वर्षांच्या मुलाचा घात

CD

पिरंगुट, ता. १४ : पुणे- कोलाड महामार्गावर पिरंगुट (ता. मुळशी) घाटात झालेल्या अपघातात सोळा वर्षीय दुचाकीस्वार मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. १४) सकाळी सव्वासात वाजता झालेल्या या अपघातात धनराज महादेव कांबळे (वय १६ , रा. सहकारनगर, पिरंगुट) याचा मृत्यू झाला. रस्त्यात पडलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे.
धनराज हा पिरंगुट घाटालगतच्या सहकारनगर भागात राहत होता. मंगळवारी सकाळी तो त्याच्या दुचाकीने पिरंगुटला जात होता. त्याचवेळी येथील ‘श्रीपाद हॅाटेल’च्या समोर पुणे- कोलाड रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करणारी जीपने ठोकरल्याने तो जागीच कोसळला. त्यात तो जखमी झाला. त्याला सुरवातीला पिरंगुट येथील खासगी रुग्णालयात व नंतर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पुणे येथील रुग्णालयातील डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, येथील पुणे- कोलाड महामार्गाच्या घाट रस्त्यातील बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. येथील रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम झाल्यानंतर लगेचच ‘श्रीपाद हॅाटेल’समोरील रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. सुमारे वर्षभर या खड्ड्यातून वारंवार वाहने गेल्याने, तसेच पावसाचे पाणी साचून हा खड्डा आणखी मोठा झाला आहे. या खड्ड्याचा आणि रस्त्याचा रंग सारखाच असल्याने हा खड्डा वाहनचालकाच्या सहजासहजी लक्षात येत नाही. अचानक खड्डा समोर आल्यानंतर चारचाकीसह दुचाकीचालकही हा खड्डा चुकवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनावर वाहन थेट गेल्यावर अपघात झालेले आहेत. येथील खड्ड्यामुळे या ठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर अपघात झालेले आहेत. त्यात काहींना प्राण गमवावा लागलेला असून अनेक जण जखमी झालेले आहेत. हा खड्डा तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणीही वाहनचालकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT