पुणे

भोडे येथील डोंगरात मृतदेह आढळला

CD

पिरंगुट, ता. ५ : मुठा खोऱ्यातील भोडे (ता. मुळशी) येथील डोंगर भागात जळालेल्या अवस्थेतील पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मंगळवारी (ता.४) ही घटना घडली. विठ्ठल तानाजी सकपाळ (वय ५२, रा. भोडे, ता. मुळशी) असे मयत व्यक्तिचे नाव आहे. याबाबत रमेश सोनबा सकपाळ (वय ४५, रा. सकपाळवाडी, भोडे, ता. मुळशी) यांनी पोलिसात माहिती दिली.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ४) सायकांळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. भोडे येथील यमुना तानाजी सकपाळ यांचा मयत मुलगा विठ्ठल हा मंगळवारी दुपारी चार वाजता शेताकडे गेला होता. तो परत न आल्याने त्याचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. त्यानंतर यमुना सपकाळ या शेतामध्ये त्याचा शोध घेण्यास गेल्या. तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी शेताच्या मागे असणाऱ्या डोंगरामध्ये विठ्ठलचा शोध घेतला असताना एका ठिकाणावरून धूर येताना दिसला. त्या ठिकाणी मयत विठ्ठल जळालेला आढळला. त्यानंतर ही माहिती पोलिसांत देण्यात आली. पौड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश जाधव व हवालदार रवींद्र नागटिळक यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. सांयकाळी पौड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT