पुणे

पोलिसांच्या बंदोबस्तामुळे निकालानंतरही ग्रामीण भागात शांतता

CD

पिरंगुट, ता. २४ : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतमोजणी शांततेत आणि सुरळीत पार पडली. निकालानंतरही दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विधानसभेच्या मतमोजणीसाठी जिल्हा अधीक्षक कार्यालयाने ग्रामीण भागासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात बंदोबस्ताचे नियोजन केले होते. जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ मतदार संघासाठी २२० अधिकारी, १०७० अंमलदार, एक दंगल नियंत्रण पथक तसेच ४ शीघ्र कृती दलाचा बंदोबस्त ठेवला होता. सुदैवाने दिवसभरातील मतमोजणी आणि निकालानंतरही कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, ‘‘या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने नऊ विधानसभा मतदार संघासाठी त्यात्या उपविभागीय अधिकाऱ्यांना नियोजन करायला सांगितले होते. त्यानुसार योग्य नियोजन झाल्याने दिवसभरात सर्वत्र शांततेत मतमोजणी पार पडली. शिवाय निकालानंतरही कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT