पिरंगुट, ता. २३ : रिहे (ता. मुळशी) येथील बोरकरमळ्यातील वेदान्त साधना वारकरी गुरूकुलमध्ये घेण्यात आलेल्या ‘धी शुद्धीकरण’ या संस्कार शिबिराची सांगता माता पिता पूजनाने झाली. पंधरा दिवस पार पडलेल्या या शिबिरात दहा ते वीस वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग होता.
शिबिरात व्यायाम, योगा, प्रार्थना, गीतापाठ, कथाकथन, मुक्त संवाद, शारीरिक आणि बौद्धिक खेळ, स्वाध्याय अनुवाद, हरिपाठ, वीरांचा इतिहास, मृदंग वादन, संत चरित्रे आदी उपक्रम राबविण्यात आले. चिंचवड येथील डॉ. सचिन जाधव यांच्या वतीने विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.
बीडमधील आचार्य स्वामी भारतानंद गिरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आमदार शंकर मांडेकर, शंकर जगताप, मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्याबा बोरकर उपस्थित होते. वेदान्त साधना वारकरी गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती बोरकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी निवृत्ती बोरकर शास्त्री म्हणाले, ‘‘समाजामध्ये नैतिक मूल्यांची जोपासना आणि भगवंताची उपासना दृढ व्हावी आणि बालमनावर सुसंस्कार घडावेत. पुढील पिढी सुसंस्कारित तयार करण्यासाठी सुसंस्कार दिले तरच संस्कार टिकतील. मोबाईल सारख्या अनेक माध्यमातून मुलांवर अनावश्यक परिणाम होत आहेत. मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्याकरिता मुलांचा बौद्धिक व शारीरिक विकास होण्यासाठी संतविचार आणि संत वाङमयाची आवश्यकता आहे. त्यासाठी संस्कार शिबिरे ही काळाची गरज आहे.’’
यावेळी पंडित महाराज क्षीरसागर, यशवंत फाले यांचे कीर्तन तसेच डॉ. संदीप महिंद, विलास घोरपडे, संतोष महाराज पायगुडे यांचे व्याख्यान झाले. प्रमोद काळे, एकनाथ सांगोलकर, विठ्ठल धोंडे, सारंग क्षीरसागर, महादेव तौर व सतीश सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शेखर जांभूळकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.