पुणे

चुकीच्या जमीन मोजणीचा शेतकऱ्यास फटका

CD

पिरंगुट, ता. २३ : लवळे (ता.मुळशी) येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चुकीच्या जमीन मोजणीचा फटका बसल्यामुळे अरुण राऊत यांनी न्याय मिळण्यासाठी पौड येथील तहसील कार्यालयाबाहेर पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.

राऊत यांच्या लवळे येथील शेत जमिनीची मोजणी काही वर्षांपूर्वी केली होती. त्यावेळी भूमिअभिलेख कार्यालयाने शेतीच्या गटाच्या हद्दीवर राऊत यांचे घर दाखविले. ते त्याठिकाणी नसून त्यापासून काही अंतरावर आहे, असे राऊत यांचे म्हणणे आहे. त्या मोजणी वेळी मोजणी अधिकाऱ्यांनी हद्दीच्या चुकीच्या खुणा दाखवल्यामुळे दोन वेळा उपोषण आंदोलन करावे लागले. त्यानंतर भोर कार्यालयाने मोजणी केली. तीही राऊत यांना मान्य न झाल्याने भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांनी त्यात लक्ष घालून पुन्हा मोजणी केली. मात्र त्या मोजणीवरही राऊत यांचा आक्षेप असल्याने त्यांनी न्यायासाठी आंदोलन चालूच ठेवले आहे. लवळे ग्रामस्थांच्या विनंतीनुसार वैद्यकीय उपचार घेऊन हा लढा चालूच ठेवणार असल्याचे सांगितले.

भूमिअभिलेख विभागाकडून योग्य मोजणी होऊन मला न्याय मिळेपर्यंत माझे आंदोलन चालूच राहणार आहे. गावकरी तसेच प्रशासनाचा मान राखून फक्त द्रव पदार्थ घेऊन तसेच वैद्यकीय उपचार घेणार आहे. मला न्याय मिळेपर्यंत माझा लढा चालूच राहणार आहे.
- अरुण राऊत, शेतकरी

वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार राऊत यांच्या जमिनीची निमताना मोजणी भोर येथील कार्यालयाने केली आहे. त्यांच्याकडील मोजणी त्यांनी अमान्य केली आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षकांनी स्वतः उपस्थित राहून राऊत यांनी मोजणी केली आहे. आमच्याकडील नोंदीनुसार तसेच कायदेशीरपणे जी कार्यवाही करायची ती पूर्ण झालेली आहे.
- स्वप्ना पाटील, उपअधीक्षक, पौड येथील भूमिअभिलेख विभाग

04502

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT