पुणे

मुळशी तालुका कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सुरेश पारखी

CD

पिरंगुट, ता. १ : मुळशी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी माण येथील सुरेश सीताराम पारखी, तर कार्याध्यक्षपदी सचिन सोपान किर्वे यांची निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय जगताप यांच्या शिफारसीनुसार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी पारखी यांना नियुक्तीचे पत्र दिले.
पारखी हे गेली वीस वर्षे काँग्रेस पक्षाचे काम करत असून, त्यांनी यापूर्वी पक्षाच्या माध्यमातून पंचायत समिती निवडणूकही लढवली आहे. पक्षाचे तालुका कार्याध्यक्षपद भूषविले आहे. किर्वे हे गेली बावीस वर्षे पक्षाचे काम करत असून, त्यांनी पक्षामध्ये यापूर्वी विविध पदांवरती काम केले आहे. काँग्रेसचे विचार समाजातील सर्व घटकांमध्ये पोचवून तालुक्यातील गोरगरीब जनता, शेतकरी, कामगार, शालेय विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या दोघांनी सांगितले.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- एकनाथ खोले (भोर विधानसभा अध्यक्ष), मधुसूदन पाडाळे (तालुका उपाध्यक्ष), राम ओझरकर (तालुका उपाध्यक्ष), प्रदिप जाधव (तालुका सोशल मिडिया सेल अध्यक्ष), शंकर बत्ताले (सेवा दल अध्यक्ष), पोपट बोंद्रे (तालुका सोशल मिडिया सेल उपाध्यक्ष), रमेश पानसरे (तालुका खजिनदार), इब्राहिम मुलाणी (अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranthambore National Park : वाघांनी भरलेल्या घनदाट जंगलात पर्यटकांना अंधारात सोडून गाईड गेला पळून, ९० मिनिटांत जे घडलं...

Sunil Chhetri: सुनील छेत्रीला सराव शिबिरातून वगळलं; सिंगापूर सामन्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे अजूनही खुले : खालिद जमील

India A VS Australia A: भारत अ संघाने लढत गमावली, पण मालिका जिंकली; अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पराभवानंतरही २-१ ने बाजी

इचलकरंजी हादरली! 'सख्ख्या भावांकडून तरुणाचा निर्घृण खून'; पत्नीशी जवळीकतेचा संशय, मित्रालाच दगडी वरवंट्याने ठेचले

Tractor Accident: देवदर्शन घेऊन परतांना भाविकांवर काळाचा घाला; दोन महिला भाविकांचा मुत्यु, २४ जखमी, एकीची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT