पुणे

पिरंगुटमध्ये ताबुताचे मिरवणुकीने विसर्जन

CD

पिरंगुट, ता. ७ : मोहरमनिमित्त पिरंगुट (ता. मुळशी) येथील मुस्लीम बांधवांनी ताबुताची मिरवणूक काढून भावपूर्ण वातावरणात त्याचे विसर्जन केले. येथील सुन्नी शाही मशिदीपासून वाजत गाजत ताबूत मिरवणुकीला सुरवात झाली. सर्वधर्मीय महिलांनी ताबूत उचलणाऱ्या भाविकांच्या पायावर पाणी वाहून ताबुताची मिरवणूक सुरू झाली. येथील कुंभारवाडा, जुनी चावडी, पवळे आळी व निकटेआळी मार्गे मिरवणूक शांततेत पार पडली. सर्वधर्मीयांच्या सहभागातून व सहकार्यातून पार पडलेल्या या मिरवणुकीनंतर ताराच्या ओढ्यातील पाण्यात ताबुताचे विसर्जन करण्यात आले. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते, पिरंगुट पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक देवदास फड, तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुन्ना शेख, बशीर शेख, नबीलाल शेख, सलीम मुलाणी, अन्वर मुलाणी, जावेद पठाण, कॉसम शेख, तसेच अन्य मुस्लीम बांधवांनी नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0: जीएसटी शून्य केला, तरीही विमा महागणार? नव्या अहवालामुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत

Maratha-OBC Reservation : आरक्षणाचा वाद पेटविण्याचा सरकारचा डाव : रोहित पवार

Prajwal Revanna Jail Job : माजी पंतप्रधानांचा बलात्कारी नातू आता पुस्तकं वाटणार; तुरुंगात मिळाली लायब्ररी क्लार्कची नोकरी, रोज मिळणार 'इतका' पगार

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

SCROLL FOR NEXT