पुणे

हिंजवडीच्या वाहतुकीसाठी प्राधिकरण करा : मांडेकर

CD

पिरंगुट, ता. ८ : हिंजवडी (ता. मुळशी) येथील वाहतूक समस्येकडे सरकारने गांभीर्याने पाहून त्यावर तातडीने उपाययोजना करावी. त्यासाठी हिंजवडीसाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन प्राधिकरण तयार करावे, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांची विधानसभेत केली.
याबाबत मांडेकर विधानसभेत म्हणाले, ‘‘हिंजवडी येथे वाहतूक कोंडीची समस्या खूपच वाढली आहे. बस वेळेवर येत नसल्यामुळे लोक खासगी वाहनांचा जास्त वापर करतात. त्यामुळे वाहतूक अजून वाढते. रस्ते अरुंद आहेत, अनेक ठिकाणी खड्डे व अपूर्ण कामे चालू आहेत. मेट्रो प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही. वाहतूक पोलिस, रस्ते विकास आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे हिंजवडीसाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन प्राधिकरण तयार करावे. बस सेवा वाढवावी, आणि मेट्रो मार्ग लवकर पूर्ण करावा. स्मार्ट सिग्नल, सीसीटीव्ही, तंत्रज्ञान वापरून वाहतूक नियंत्रण करावे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी आणि रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि पर्यायी रस्त्यांचे काम तातडीने सुरू करावे. ही समस्या केवळ वाहतूक कोंडीची नाही, तर राज्याच्या औद्योगिक विकास, नागरिकांचे आरोग्य आणि कामकाजाच्या कार्यक्षमतेशी जोडलेली आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपायुक्तच बनल्या मालकीणबाई? मसाज, भांडीकुंडी अन् धमक्या… व्हिडिओ व्हायरल! सफाई कामगार महिलेचे धक्कादायक आरोप

समलैंगिक संबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; CAची आत्महत्या; 22 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक

शिक्षक मुंबईत! 'आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे हाल; शाळा बंदच्या निर्णयावर ठाम'; राज्य सरकारकडून निघाला नाही तोडगा

मंदिराचा पदाधिकारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायचा; तिरुपती देवस्थानने केली मोठी कारवाई

PMC Development : रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार; कृती पथकाची निर्मिती; कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT