पुणे

पर्यटकांची पावले लिंग्या घाटाकडे

CD

पिरंगुट, ता. २६ : लवासा (ता. मुळशी) परिसरातील धामण ओहोळमधील लिंग्या घाटातील धबधबा आणि बाँबे पॅाइंट म्हणजे पर्यटकांसह गडप्रेमींचे आवडते ठिकाण ठरत आहे. त्यामुळे वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले लिंग्या घाटाकडे वळायला लागलीत. कोसळणारा पाऊस, ढगांशी लपंडाव खेळणारी सह्याद्रीची रांग, घाटावरची बोचरी हवा, कारवीत बुजलेल्या वाटा शोधताना आलेला चकवा आणि त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असल्याचे येथे येणाऱ्या पर्यटकांचे म्हणणे आहे.
धामण ओहोळ गावाच्या पश्‍चिमेकडील लिंग्या घाटात सुमारे वीस ते पंचवीस फूट उंचीचा पडझड झालेला आणि मोडकळीस आलेला दगडी सुळका आहे. याच लिंगादेवाच्या खालील उतारावर डोळ्यांचे पारणे फेडणारा हा धबधबा आहे. धामण ओहोळपासून घाटापर्यंत दाट धुक्याची दुलई, अंगावर कोसळणारा पाऊस आणि पायवाटेवरील कधी काटेरी तर कधी मुलायम स्पर्शाच्या झाडाझुडपांतून हलकासा चिखल, मुरूम तुडवीत जाणाऱ्या पर्यटकांना इथली वनश्री आनंद देत आहेत.
बोरीचा ओढा ओलांडल्यावर डावीकडील वाट वाघजाई मंदिर आणि बाँबे पॅाइंटवर जाते. तेथील पठारावरून कुर्डूगड आणि रायगड जिल्ह्यातील निसर्ग न्याहाळता येतो. येथे वीर बाजी पासलकरांच्या वास्तव्यांच्या खुणा असलेला पडझड झालेला वाडा असून तिथे चौथऱ्यांचे दगड, घरे, मंदिर आहे. वाघजाई मंदिरापासून खाली कुर्डूगडाकडे व कोकणात उतरण्यासाठी वाट सुरू होते. माघारी फिरल्यावर विजेच्या टॅावरपासून दुसऱ्या वाटेने लिंगा घाटाकडे जाताना लिंगादेव सुळक्यापासून धबधबा नजरेस येतो. हा धबधबा सरळ रेषेतील उंचावरून कोसळणारा आहे.

पर्यटकांनी घ्यावयाची काळजी
- लिंगा देवाच्या सुळक्यावर चढू नये
- घसरणाऱ्या दगडांवर पाय ठेवून सेल्फी काढू नये
- पार्किंग योग्य ठिकाणी करावे

अधिक माहितीसाठी संपर्क
अडचणीच्या काळात गाइडचे काम पाहणाऱ्या वेदांत पासकर यांना या क्रमांकावर संपर्क साधू शकता - ७०५७७५८६५७

ग्रामपंचायतीच्या वतीने बोरीच्या ओढ्यावर रस्सी बांधणार असल्याने पर्यटकांना सुरक्षित प्रवास करता येईल.
संजय पासलकर, उपसरपंच, धामण ओहोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT