पुणे

पिरंगुट येथे वाहतूक कोंडीचा कहर

CD

पिरंगुट , ता. २३ : पुणे- कोलाड महामार्गावरील मुळशीतील कोकणवाहिनी आता वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडली आहे. पिरंगुट परिसरात कोंडीने रविवारी (ता.२३) उच्चांक केला. सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांच्या वाहनांनी केलेली मोठी गर्दी, लवळे फाटा आणि पिरंगुटचा आठवडे बाजार आणि वाहतूक विभागाच्या मनुष्यबळाची कमतरता आदी कारणांमुळे येथील वाहतूक कोंडीने कहर केला होता.

पोलिसांची अपुरी संख्या आणि दिवसभर वाहतूक नियमन करून ताटकळल्याने पोलिसांची वैतागलेली मानसिकता यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत गेली. भुकूम ते पिरंगुट घाट दरम्यानचा रस्ता वगळता दिवसभरात भूगाव ते घोटावडे फाटा या दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांसह पर्यटक आणि स्थानिक नागरिकही त्रस्त झाले होते. मातेरेवाडी फाटा, आंग्रेवाडी फाटा, लवळे फाटा, पिरंगुट कॅंप, पिरंगुट पूल, घोटावडे फाटा आदी ठिकाणी सायंकाळी सहानंतर येथील मोठ्या कोंडी झाली. लवळे फाटा येथील घाट रस्त्यालगतचे श्रीपाद हॅाटेल ते कासार आंबोली येथील शिंदेवाडीपर्यंत सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, बावधन पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागाकडे असलेले सध्याचे मनुष्यबळ अपुरे असल्याने पडत आहे. पोलिसांनाही वाहतूक नियमन करताना कसरत करावी लागत आहे.त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

04952

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT