पुणे

लवळेच्या शिबिरात ३७६ महिलांची तपासणी

CD

पिरंगुट, ता. २९ : लवळे (ता. मुळशी) येथील अॅनिमियामुक्त गाव शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात महिलांची मोफत सर्वरोग निदान तपासणी करण्यात आली. ३७६ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
सर्वसाधारण आजारांची तपासणी करून त्यावर औषधोपचार करण्यात आले. शिबिरामध्ये रक्त तपासणी, रक्तदाब, साखर, स्त्री रोग चिकित्सा, नेत्ररोग, गरोदर माता तपासणी, कर्करोग आणि आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात आले. डॉ. श्रुती कांडगाळे यांनी महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थिनींचे आरोग्य विषयक समुपदेशन केले. पंचायत समिती मुळशी येथील आरोग्यविस्तार अधिकारी दिनेश पंचवाघ, भुकूम येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांच्या समुदाय आरोग्य अधिकारी स्वाती गाडे, चंद्रकांत शेकडे, अनिता मदने, सोनाली सातव, रंजना चव्हाण यांनी शिबिरासाठी मदत केली.
सिंबायोसिस हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी, ऋतुजा वेळकुंडे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रवीना चावरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. वैष्णवी परदेशी, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अंजली जोग, स्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रुती कांडगाळे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT