पुणे

भूगाव ते पिरंगुटची कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना

CD

पिरंगुट, ता. १५ : पुणे- कोलाड महामार्गावरील भूगाव ते घोटावडे फाटा या मुळशी तालुक्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
भूगाव ते घोटावडे फाटा मार्गावीरल वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पाठपुरावा सातत्याने सुरू झाला आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. १५) पीएमपीएमएलचे विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता चासकर, एमएसआरडीसीच्या अंतर्गत बीएमसी कंपनीचे अभियंता सिद्धार्थ साठे, तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून पिरंगुट रस्त्यांची संयुक्त पाहणी व सर्वेक्षण केले. त्यानुसार घोटावडे फाटा येथील बस थांब्यांच्या स्थलांतरांच्या जागा निश्चित केल्या. अतिक्रमणधारकांना जागा मोकळ्या करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. रिक्षावाले, तसेच खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कडक सूचना देऊन कारवाईचा इशारा देण्यात आला. तसेच, जुन्या बस थांब्यांवर स्थलांतरांचा फलक, नव्या बसथांब्यावर बस क्रमांकाचा फलक लावणे, तसेच शेड उभारणे आदी उपाय सुरू केले.

रस्त्याची काही किरकोळ कामे पूर्ण करणे, अतिक्रमणांवर कारवाई करणे, नव्या बसस्थानकांच्या जागांची पाहणी व निश्चिती, फलक लावणे आदी कार्यवाही आज करण्यात आली.
- दत्ता चासकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, बावधन

घोटावडे फाटा येथील चौकाचे रुंदीकरण झाल्याने तेथील बस थांबे चौकालगत आले आहेत. त्यामुळे त्यांचे स्थलांतर योग्य ठिकाणी करण्याच्या जागा आज निश्चित केल्या. त्या जागेवर शेड उभारणीसाठी ग्रामपंचायतीची मदत घेणार आहोत. तेथील थांब्यासमोर चौकोन आखून नो पार्किंगचे फलक लावणार आहोत. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
- राजेश जाधव, विभागीय व्यवस्थापक, पीएमपीएमएल

वाहतूक कोंडीची ठिकाणे व कारणे संबंधित अधिकाऱ्यांना दाखविण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेड उभे करण्यासाठी मदत करणार आहोत.
- चेतन निकटे, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT