पिरंगुट, ता. २५ : पुणे-कोलाड महामार्गावर पिरंगुट (ता.मुळशी) येथे रविवारी (ता.२५) वाहतूक कोंडीने कहर केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांनी रविवारच्या मुहूर्तावर रॅली, पदयात्रा आणि वैयक्तिक भेटीगाठी घ्यायचा घाट घातला होता. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराची तसेच पर्यटकांची वाहने यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. यामुळे दिवसभर प्रवासी हैराण झाले होते.
लवळे फाटा आणि पिरंगुटचा आठवडे बाजार आणि वाहतूक विभागाच्या मनुष्यबळाची कमतरता आदींमुळे येथील वाहतूक कोंडीने सर्वजण त्रस्त झाले होते. बेजबाबदार वाहनचालकामुळे वाहतूक कोंडी वाढतच होती. बहुतांशी उमेदवारांनी रविवारचा मुहूर्त पाहून प्रचाराचा नारळ फोडण्याचा सपाटा लावलेला होता. त्यामुळे या उमेदवारांच्या प्रचाराच्या वाहनांनी मुळशीतील रस्ते जाम झाले होते.
भूगाव येथील रामनदी ते आंग्रेवाडी फाटा तसेच लवळे फाटा ते घोटावडे फाटा या दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांसह पर्यटक आणि स्थानिकही त्रस्त झाले होते. मातेरेवाडी, आंग्रेवाडी फाटा, लवळे फाटा, पिरंगुट कॅंप, घोटावडे फाटा आदी भागात सकाळी दहा वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोंडीस सुरुवात झाली होती.
तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
लवळे फाटा येथील घाट रस्त्यालगतचे श्रीपाद हॅाटेल ते कासार अंबोली येथील शिंदेवाडीपर्यंत सुमारे तीन किलोमीटरच्या अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात सर्वाधिक कोंडी झाली ती पिरंगुट येथील कॅंप भाग, लवळे फाटा व घोटावडे फाटा येथे. लवळे फाटा येथील पुणे कोलाड रस्ता ते लवळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. घोटावडे फाटा येथील पुणे-कोलाड या मुख्य रस्त्यासह भरे रस्ता, लवासा रस्ता आदी रस्त्यांवरही सुमारे दीड किलोमीटर अंतरांच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.
वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी
भूगावपासून घोटावडे फाट्यापर्यंतचा रस्ता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत बावधन पोलिस ठाण्याकडे गेला आहे. बावधन पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागाकडे असलेले सध्याचे मनुष्यबळ अपुरे असल्याने पडत आहे. पोलिसांनाही वाहतूक नियमन करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
05164
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.