पिरंगुट, ता. ४ : ‘‘आयुष्याच्या शेवटपर्यंत शिवसेना हाच श्वास आणि जगणं असलेले ज्येष्ठ बंधू स्व. राजू गोळे यांनी सन २०१२ची पंचायत समिती निवडणूक लढविली. त्यावेळी गावकी भावकीच्या राजकारणात त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांचा काही त्रुटींमुळे निसटता पराभव झाला. यावेळी चुका टाळून पराभवाची सल कायमची काढून टाकण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मैदानात उतरलो आहोत. माजी सभापती स्व. बाळासाहेब पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. राजू गोळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा शिवसैनिक स्व. अमित वाघ यांनीही आयुष्यभर हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक म्हणून निष्ठेने काम केले. या तीनही शिवसैनिकांच्या कार्यस्मृती जपत त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी, तसेच नरवीर सरदार पिलाजी गोळे यांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सर्व शिवसैनिक एकवटलेले आहेत,’’ अशी भावना पिरंगुट पंचायत समितीचे उमेदवार रामदास गोळे यांनी प्रचार यात्रेदरम्यान व्यक्त केली.
यावेळी आबासाहेब शेळके म्हणाले, ‘‘यापूर्वी मी स्वतः व स्व. राजू गोळे यांनी नवखे उमेदवार असतानाही पक्षाचा आदेश मानून सन २०१२मध्ये एकत्रित निवडणूक लढवून या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी झुंज दिली. त्या निवडणुकीत आम्हा दोघांचाही निसटता झालेला पराभव पुसून टाकण्यासाठी पुन्हा एकदा मी स्वतः पिरंगुट- भूगाव गटातून जिल्हा परिषद उमेदवार; तर पंचायत समिती गणासाठी रामदास गोळे निवडणूक लढवीत आहोत. शिवसेनेच्या पाठीशी या गटातील व गणातील सर्व शिवसैनिक एकदिलाने प्रचारामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे यावेळी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सैनिक नक्कीच यश संपादन करणार आहेत. पिरंगुट, भुगाव, लवळे, उरावडे या मोठ्या गावांमध्ये सध्या मशालमय वातावरण झालेले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.