पुणे

मुळशीतील मतदारांचा कौल ठाकरे शिवसेनेकडे : शिंदे

CD

पिरंगुट, ता. ५ : ‘‘मुळशी तालुक्यात यावेळी परिवर्तनाची लाट असून, त्याची सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिरंगुट- भूगाव गट व गणापासून होणार आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार आबासाहेब ऊर्फ माधवराव पांडुरंग शेळके, भूगाव गणाचे उमेदवार अनिल पवार व पिरंगुट गणाचे उमेदवार रामदास गोळे यांचा विजय निश्चित आहे. यापूर्वी याच गटातून दोन वेळा शिवसेनेच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला. याच गटातून व त्याच पक्षाकडून स्वतःचे भविष्य अजमावण्यासाठी जिल्हा परिषदेसाठी शेळके नव्या दमाने उभे असून, पंचायत समितीसाठीचेही दोन्हीही उमेदवार सक्षम आहेत. सर्व उमेदवारांच्या पाठीशी शिवसैनिक एकदिलाने उभे आहेत. शिवसैनिकांची ताकद व मतदारांची साथ यांमुळे विजय सुकर झाला आहे. यावेळी संपूर्ण तालुक्यात ठाकरे शिवसेनेच्या बाजूने मतदारांचा कौल आहे,’’ असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला.
भूगाव येथील शंभू महादेव व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर मशाल पेटवून शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने विजयाचा निर्धार केला. यावेळी आबासाहेब शेळके म्हणाले, ‘‘भूगाव हे गाव पुणे व मुळशीला जोडणारे आहे. शहरालगत असूनही आजही इथे वीज, पाणी, रस्ता, नित्याची वाहतूक कोंडी आदी समस्या असून, त्यावर ठोस उपाययोजना करून त्या सोडविण्याचा आमचा संकल्प आहे.’’ अनिल पवार म्हणाले, ‘‘भूगावमधून वाहणारी रामनदी हा आमचा ऐतिहासिक ठेवा व वारसा आहे. तिचे पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. येथील वाढते नागरीकरण व त्यासाठीच्या सुविधा देण्यात आपण कमी पडतोय, ही खंत आहे. त्या पुरविण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही शाश्वत प्रयत्न करणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT