पुणे

कातरखडकमध्ये घरावर डंपर कोसळून महिला ठार

CD

पिरंगुट, ता. १८ : कातरखडक (ता. मुळशी) येथील भैरवनाथवाडी येथे मंगळवार (ता. १७) रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास मुरूम व माती वाहून नेणारा डंपर (क्र. एम.एच. ०४ एल.ई. ८६०३) घरावर उलटल्याने डंपरमधील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पन्नास वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नंदाबाई जगन्नाथ मालपोटे (वय ५०), असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या कुटुंबातील अन्य तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मयत नंदाबाई यांचे पती जगन्नाथ, सून कांचन व नातू कैवल्य यांचा समावेश आहे.
संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कंपनी व प्रशासनाकडून कारवाईच्या ठोस आश्वासन मिळण्यासाठी, तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी मृत महिलेचा मृतदेह ढिगाऱ्यापासून बाजूला काढू दिला नाही. त्यामुळे बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंत सुमारे दहा ते बारा तास मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखालीच अडकून पडलेला होता. बुधवारी सकाळी मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी तसेच अन्य अधिकारी घटनास्थळी पोचल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांवर कठोर कारवाई व नुकसान भरपाईची मागणी करीत मृतदेह बाहेर काढण्यास मज्जाव केला होता. यावेळी तहसीलदार चोबे यांनी ग्रामस्थांना भरपाईचे आश्वासन देण्याचे सांगितल्यावर मृतदेह पौड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. दुपारी चार वाजता नंदाबाई यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कातरखडक परिसरात रिंगरोडच्या कामासाठी लागणारा मुरूम व मातीचा माल वाहतूक करण्यासाठी रोज सुमारे शंभरहून अधिक डंपर कार्यरत आहेत. या डंपरची वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. अपघातग्रस्त मालपोटे यांचे घर खांबोली- आंधळे रस्त्यालगत आहे. आंधळे गावाकडून खांबोलीकडे जाताना दक्षिण दिशेच्या सखल भागात असलेल्या या घरावर मातीने भरलेला हा डंपर पलटी झाला. याठिकाणी रस्त्यालाही तीव्र उतार आहे. चालकाचा डंपरवरील ताबा सुटल्याने अथवा तो नशेत असल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी म्हणाले, ‘‘डंपरचालकाने बेदरकारपणे वाहतूक करून मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.’’

चालकांवर आरोप
या डंपरचे चालक मद्य पिऊन, तसेच गांजासारखे गुंगी आणणारे पदार्थ खाऊन डंपर चालवितात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यांच्या गाड्यांचा वेगही सुसाट असतो. डंपरचे पुढील प्रकाशदिवे जास्त क्षमतेचे असल्याने समोरील चारचाकी असो अथवा दुचाकी असो, अशा कोणत्याही वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण करते.

कातरखडक येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तेथील कुटुंबावर कोसळलेले दुःख मोठे आहे. भरपाई म्हणून संबंधित कंपनीकडून अपघातग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत देत आहोत. घराचे नुकसान झाल्याने नवीन घर बांधणीसाठी पंधरा लाख रुपये, तर मृत महिलेच्या मृत्यूबद्दल आठ लाख रुपये, असे एकूण २३ लाख रुपयांची भरपाई देत आहोत.
- विजयकुमार चोबे, तहसीलदार, मुळशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

Jalgaon News : जळगाव हादरलं! वाळूमाफियांची मुजोरी वाढली, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ८ वेळा हल्ले

SCROLL FOR NEXT