पुणे

मुळशीतील वाहतूक कोंडी तत्काळ सोडविण्याची मागणी

CD

पिरंगुट, ता. १२ : मुळशी तालुक्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनसेच्या वतीने बावधनच्या वाहतूक पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पौड रोड, चांदणी चौक, भुगाव, लवळे फाटा, पिरंगुट येथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे येथे राहणाऱ्या सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. या वाहतूक कोंडी मध्ये अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणारे वाहने असतात. ही प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक कुठेही थांबून प्रवाशांना गाडीत घेतात. त्यामुळे कोंडी होऊन वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. हा मार्ग कोकणाकडे जात असल्यामुळे अवजड वाहनेदेखील याच मार्गाने प्रवास करतात. येथे वाहतूक पोलिस व ट्रॅफिक कंट्रोल वॉर्डनची लवकरात लवकर नियुक्ती करावी व वाहतूक सुरळीत करावी. तसेच पिरंगुट घाट परिसरात रस्त्यावर पडलेल्या खडीबाबत तातडीने कारवाई करावी. या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी लाइट रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत. घोटावडे फाटा चौक येथील बंद असलेला सिग्नल तत्काळ सुरू करावा. या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने येत्या आठ दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील अंधारे, जिल्हा संघटक अनिल अहिरे, रूपेश कदम, फिरोज शेख, महेश मालुसरे, अर्जुन काळभोर, शुभम शेवाळे, नामदेव वाघमारे, विशाल गोडसे, प्रथमेश कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT