पुणे

उरवडे- चोरगेवाडी रस्ता खचला

CD

पिरंगुट, ता. २७ : उरवडे (ता. मुळशी) येथील उरवडे ते चोरगेवाडी रस्त्याला मोठी भेग पडल्याने दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ही समस्या गंभीर बनली असून, तातडीने संरक्षक भिंत बांधून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
शेलारवाडीतील गराडे वस्तीजवळ पाच वर्षांपूर्वी हा रस्ता बांधण्यात आला होता. रस्त्याच्या एका बाजूला काळी माती असल्याने रस्ता खचून मधोमध सुमारे १५० फूट लांबीची भेग पडली आहे. रात्रीच्या वेळी ही भेग न दिसल्याने दुचाकींची चाके त्यात अडकून अपघात होत आहेत. चोरगेवाडी, काळभोरवाडी आणि शेलारवाडी येथील ग्रामस्थ, विद्यार्थी व दुग्धव्यावसायिकांना या धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

मी कालच तो रस्ता पाहिला आहे. त्याचे अंदाजपत्रक उद्या तयार होणार असून, ते जिल्हा परिषदेला निधी मागणीसाठी सादर करण्यात येणार आहे.
- अंजली काठवदे, रस्ता अभियंता

तेथील रस्त्याला तात्पुरता मुरूम वापरून चर व भेग भरून काढणार आहे. त्यामुळे अपघाताला तात्पुरता आळा बसेल. नव्याने पाठविलेले अंदाजपत्रक व प्रस्ताव मंजूर होताच तेथील रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केला जाईल.
- बाळासाहेब सायंबर, उपअभियंता

05408

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींनी 'इश्क करो पार्टी'ची केली घोषणा, पक्षात येण्यासाठी वयाची अट; CJPच्या दीपकेंना म्हणाले मूर्ख

Navi Mumbai: नवी मुंबईत वीज संकट! नागरिक मध्यरात्री रस्त्यावर; महिला अंथरून घेऊन पोहोचली महावितरण कार्यालयात

Who is Manav Suthar?: कोण आहे मानव सुथार? पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स घेऊन चर्चेत आलेल्या टीम इंडियाच्या नव्या स्टारची कहाणी"

AI सांगणार कोणता कॉल आहे फेक! Google ने आणलं कमाल स्कॅम डिटेक्शन फीचर; वॉइस क्लोन अन् फसव्या कॉल्सची खैर नाही

पहिल्या लग्नात विश्वासघात ! घटस्फोटानंतर तब्बल 12 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

SCROLL FOR NEXT