पुणे

परिंचे परिसराला पावसाचा तडाखा

CD

परिंचे, ता.११: परिंचे (ता.पुरंदर) परिसराला मंगळवारी (ता. १०) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. या वादळात गुरांचे गोठे तसेच घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तरकारी पिके व चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी धनसिंग जाधव यांनी केले आहे.

सटलवाडी, चौधरवाडी, यादववाडी, कांबळवाडी तसेच करवंदे वस्ती परिस्थिती अनेक गोठ्याचे पत्रे उडून गेले आहेत. टोमॅटो व भोपळ्याचे पीक भुईसपाट झाल्याचे सटलवाडीचे सरपंच सागर करवंदे यांनी सांगितले.
परिंचे परिसरात वादळी वाऱ्यामुळे चारा पिके जमीनदोस्त झाली असून, मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरात टोमॅटो, वांगी, मिरची, गवार आदी तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागासह महसूल विभागाने या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच अर्चना राऊत यांनी केली आहे. यावेळी उपसरपंच गणेश पारखी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव उपस्थित होते.
यावेळी नारायण यादव, चंद्रकांत जाधव आदी शेतकरी उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असल्याचे गाव कामगार तलाठी सुजित मंडलेजा यांनी सांगितले आहे.

विद्युत पुरवठा चोवीस तास खंडित
वादळात खांब व तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करून काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत केला. मात्र, परिंचे गावठाणात दोन ठिकाणी खांब पडल्याने चोवीस तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

संसाराचा गाडा हाकायचा कसा?
अस्मानी संकटामुळे तरकारीचे मोठे नुकसान झाले असून, राहाते घर व गुरांच्या गोठ्याची पडझड झाली आहे. तरकारी पिकाला बाजारभाव नाही, त्यामध्ये अस्मानी संकटात झालेले नुकसान पाहता काबाड कष्ट करून देखील या संसाराचा गाडा कसा हाकायचा? असा सवाल शेतकरी धनसिंग जाधव यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांच्या पत्नीसह कुटुंबाला अश्रू अनावर झाले नाहीत.

01936

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT