पुणे

राजे उमाजी नाईक संघाने पटकावला चषक

CD

परिंचे, ता.७ : श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे ''वीर प्रीमियर लीग २०२३ फुलपीच क्रिकेट स्पर्धा पार पडली. यात राजे उमाजी नाईक क्रिकेट क्लबने माळवाडी येथील श्रीनाथ क्रिकेट क्लब या संघावर मात करत २१ हजार रुपये व चषक पटकावला तर श्री नाथ क्रिकेट क्लबने द्वितीय क्रमांकावर विजय मिळविल्याने त्यास १५ हजार व चषक देण्यात आला. संतोष वाघ क्रिकेट क्लबला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागते. त्यास क्रमांक ११ हजार व चषक पटकावला.

श्री नाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विजयी संघांना पारितोषिक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत वीर परिसरातील १२ संघांनी सहभाग घेतला होता. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते २७ मे रोजी स्पर्धेचे उद्‌घाटन केले होते. राहुल खोमणे, दादा शितकल, अशोक धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, चंद्रकांत बनकर यांनी सामन्यांचे नियोजन केले होते.
बक्षीस वितरण समारंभासाठी माजी पंचायत समिती सदस्य दिलीपदादा धुमाळ, सरपंच माऊली वचकल, विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ, विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ तसेच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बाबूकाका धुमाळ, राजेंद्र कुरपड, संजय कापरे, दत्तात्रेय समगीर आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच गावात सामाजिक सलोखा कायम राहावा व तरुणांनी संघटित होण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

01964

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT