पुणे

परिंच्यात शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे

CD

परिंचे, ता.३ : परिंचे (ता.पुरंदर) येथील पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या वतीने परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत मका व ज्वारी चारा बियाण्याचे वाटप गावच्या सरपंच अर्चना राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
परिंचे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकमध्ये असून शंभर टक्के चारा बियाण्याचे वाटप अनुदान मिळाले आहे. चारा बियाणे वाटप उपक्रम वर्षभर राबविला जात असून चालू वर्षी कार्यक्षेत्रातील ६९० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.ॲडव्हान्ता मका ३५० किलो व शुगरगेझ ज्वारी ७० किलो वाटप करण्यात आले. तोंडल (ता.पुरंदर) येथील गाळपेर जमीनीसाठी १५० किलो मका बियाण्याचे वाटप केल्याचे डॉ.परमेश्वर परिहार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कार्यक्रमात दूध उत्पन्नामध्ये चांगली वाढ झाल्याचे दुग्धोत्पादक शेतकरी संतोष शेडगे यांनी सांगितले. यावेळी माजी उपसरपंच गणेश पारखी, पशुधन विकास अधिकारी डॉ.परमेश्वर परिहार, सहाय्यक अधिकारी डॉ. दादासाहेब जाधव, नवलेवाडीचे माजी सरपंच दत्ता भोंगळे, दत्तात्रेय दुधाळ, मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी अनिल दुधाळ, सतीश जाधव, सुनील दुधाळ, रोहिदास नवले तसेच राऊतवाडी, नवलेवाडी, सटलवाडी, माहूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


02451

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT