परिंचे, ता.३१ : परिंचे (ता.पुरंदर) नजिक दुधाळवाडी येथील संत सावतामाळी तरुण मंडळाच्या वतीने रुद्र गंगेला आलेल्या पाण्याचे खणा नारळाने ओटी भरून पूजन करण्यात आले. जलपूजन करण्यासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.
रुद्रगंगा नदी वाहू लागल्याने परिंचे व परिसराचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे धुराजी दुधाळ यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्या शैला जाधव उपस्थित होत्या.
सकाळी रुद्र गंगेच्या पाण्याने डोंगरावरील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांना जलाभिषेक घालण्यात आला संत सावतामाळी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक करून
ढोल ताशांच्या गजरात दुधाळवाडी येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने जलपूजन करण्यासाठी निघाले सुवासिनींनी नदीच्या पात्रात जाऊन पाण्याची पूजा करून खणा नारळाने ओटी भरली. पाण्यात साडी चोळी अर्पण करून बारा महिने वहात राहण्यासाठी प्रार्थना केली असल्याचे शैला जाधव यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच दत्तात्रेय दुधाळ, संतोष दुधाळ, लीलावती दुधाळ, ताराबाई दुधाळ, दुर्गा दुधाळ, छाया दुधाळ, स्वाती दुधाळ, वैशाली दुधाळ, सोनल दुधाळ, शोभा दुधाळ, सुभाष दुधाळ, अनिल दुधाळ, समीर दुधाळ, प्रशांत दुधाळ, राजेंद्र दुधाळ, प्रदीप दुधाळ, शुभम दुधाळ, अशोक जाधव, रवींद्र दुधाळ, संजय जगताप, मोहन दुधाळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
02647
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.