पुणे

हरभरा पीक व्यवस्थापनाचे परिंचे येथे शेतकऱ्यांना धडे

CD

परिंचे, ता.२० : परिंचे (ता.पुरंदर) येथील राऊतवाडी येथे पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पिकाची शेतकरी शेतीशाळा घेण्यात आली. यावर हरभरा पीक व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.
सहाय्यक कृषी अधिकारी संदेश समगीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून हरभरा पीक परिस्थिती, कीड-रोग ओळख व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, कामगंध सापळे व त्यांचे कीड नियंत्रणात असणारे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
कृषी विभागाने नुकतेच महाविस्तार एआय ॲप विकसित केले आहे. शेतकऱ्यास डिजिटल सेवेच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध आणि रिअल-टाइम कृषिविषयक सल्ला देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा महाविस्तार एआय ॲप विकसित करण्यामागचा उद्देश असून या प्लॅटफॉर्मवर हवामान, माती, कृषी सल्ला, खाद-बियाणे, कीड-रोग नियोजन, बाजारभाव, बाजारपेठ व त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध आहे. महाविस्तार हे शाश्वत शेती, डिजिटल सक्षमीकरण आणि समृद्ध गावे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे सांगून सगळ्या शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय ॲप वापरावे, असे आवाहन केले. यावेळी परिंचे गावचे माजी सरपंच अर्चना राऊत, कृषिसखी रूपाली राऊत, वैभव धुमाळ, निखिल वीर, दत्तात्रेय भोंगळे, शेतकरी उपस्थित होते.

02890

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात मोठी दुर्घटना टळली, 50 प्रवासी असलेल्या PMPML बसने अचानक घेतला पेट, नंतर काय घडलं?

Maharashtra Land Revenue Code amendment : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये एन. ए. परवानगीबाबत सुधारणा, कोल्हापूरला होणार मोठा फायदा

AUS vs ZIM : ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात? झिम्बाब्वेच्या अविश्वसनीय विजयाने 'ब' गटाचे समीकरण बदलले...

Latest Marathi News Live Update : जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक

Rohit Patil : "‘जंगलात भरली लांडग्यांची सभा’; रोहित पाटील यांच्या पोस्टने जिल्हा राजकारणात खळबळ!"

SCROLL FOR NEXT