पुणे

आधी मतदानाचे कर्तव्य; मग लग्न मंडपात प्रवेश

CD

परिंचे, ता. ७ : आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न सोहळा. असे असले तरी शनिवारी (ता. ७) परिंचे (ता.पुरंदर) येथील नववधू स्नेहल नारायण जाधव हिने कलवऱ्यांसह पहिल्या मतदानाचा हक्क बजावला व यानंतर लग्न मंडपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
स्नेहल जाधव व शुभम राजेंद्र पायगुडे यांचा शुभविवाह नसरापूर (ता. भोर) येथे आयोजित केला होता. लग्नसोहळ्याची धावपळ असताना स्नेहलने मतदान केले. सासरी गेल्यावर नाव बदलले जाते. तसेच मतदानही सासरी होते. परिंचे गावात माहेरी असताना शेवटचे मतदान करण्याचे भाग्य मला मिळाले असल्याची भावना नववधू स्नेहलही व्यक्त करून मतदानाचा हक्क बजावून लग्न सोहळ्यासाठी येण्याचे आवाहन करत होती.
यावेळी माजी सरपंच ऋतुजा जाधव, शुभांगी कदम, संजय जाधव, शुभम जाधव, सचिन नवले, जनाबाई नवले, अमृता नवले, ज्ञानेश्वर नानगुडे उपस्थित होते.


02942

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT