परिंचे, ता. ९ : परिंचे (ता.पुरंदर) परिसरात कांदा काढणीच्या कामात मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. त्यामुळे कांदा बारदाना पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. मिळेल त्या किमतीत बारदाना पिशव्यांची खरेदी करावी लागत असून यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लूट केली होत आहे, असे कांदा उत्पादक शेतकरी रमेश जाधव यांनी सांगितले.
परिंचे, वीर, हरगुडे परिसरात तसेच पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गरवी कांद्याची काढणी सुरू आहे. बाजारात आठ ते दहा रुपयांना मिळणारी पिशवी आता वीस रुपयांपर्यंत जाऊन पोचली आहे. अनेक ठिकाणी शोधाशोध केल्यावर पिशवी मिळत आहे. अचानक पिशव्यांचा तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांनी लूट केली जात असल्याचे रमेश जाधव, ऐनाक्षिकांत जाधव यांनी सांगितले. कांदा काढणीच्या हंगामात अचानक व्यापाऱ्यांनी पिशव्यांचा तुटवडा निर्माण करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. प्रत्येकजण शेतकऱ्यांना वेठीस धरून लूट करत असून शेतकऱ्यांना बेजार केले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
परिंचे येथील बारदाना पिशव्यांचे व्यापारी बाळासाहेब दुधाळ यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, की आमच्याकडे पिशव्या उपलब्ध होत्या तोपर्यंत कमी भावात शेतकऱ्यांना पुरवठा केला होता.आता अचानक येणारा माल बंद झाल्याने बाजारभाव वाढले आहेत.
दरम्यान, कंपनीमधून माल येत नसल्याने पिशव्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे पुणे येथील व्यापारी महेश ठक्कर यांना सांगितले.
02990
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.