परिंचे, ता. १६ : परिंचे (ता.पुरंदर) गावच्या पाणलोट क्षेत्रात भारत फोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून बंधारा खोली करणाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. खोलीकणारमुळे परिसर पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुष्कराज जाधव व जलदूत समन्वयक सागर काळे यांच्या हस्ते नारळ फोडून खोलीकरणास प्रारंभ करण्यात आला. खोलीकरणामुळे बंधाऱ्यात साठलेला गाळ काढल्यास मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढणार आहे. भूजलपातळी सुधारण्यासाठी मदत होणार आहे.
भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण जबाबदारी समजून कंपनीच्या वतीने दोन पोकलेन यंत्रांच्या माध्यमातून परिंचे परिसरातील गुळूमदरा, नाथ डोंगर, हरणी महादेव डोंगर आदी ठिकाणच्या पन्नासहून अधिक बंधाऱ्यांचा गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे
जलसंधारणाच्या कामांमुळे भविष्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी, शेतीला बळ देण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत पुष्कराज जाधव व्यक्त केले आहे.
कार्यक्रमासाठी उद्योजक पप्पू काळे, अमित काळे, लपतळवाडी सरपंच रवींद्र मोरे, अजित नवले आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी नरसिंह नानगुडे, मिलिंद दुधाळ, स्वप्नील जाधव, श्रीपाद गुरव, शांताराम घारमळकर, सोमनाथ गिरमे, श्यामकांत जाधव आदी उपस्थित होते.
02994
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.