पुणे

वंचित आदिवासींना मिळणार आता हक्काचा निवारा

CD

पौड, ता. २७ : मुळशी तालुक्यातील कातकरी समाजाला स्वतःच्या हक्काच्या जागेअभावी घरे नाहीत. त्यामुळे पिढ्यानपिढ्या स्थलांतरित होऊन त्यांना जीवन व्यतीत करावे लागते, परंतु मुळशी पंचायत समिती आणि रेलफ़ॉर फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून वंचित आदिवासींना आता हक्काचा निवारा मिळणार आहे. कातकरी बांधवांसाठी आंदेशे येथे तालुक्यातील पहिला गृहनिर्माण प्रकल्प साकारला जात आहे.

तालुक्यातील कातकरी समाज आजही काबाडकष्ट करून जीवन जगत आहे. दुसऱ्याच्या शेतात राबून किंवा मासेमारी करून उपजीविका भागविणारा हा समाज आहे. अलीकडे या समाजातही स्वतःच्या विकासाची जागृती निर्माण होवू लागली आहे. कातकरी समाज हा गावाबाहेर वस्ती करून राहतो, परंतु त्यांना स्वतःच्या हक्काची जागा नसल्यामुळे ते पक्की घरे बांधू शकत नाही. त्यामुळे पिढ्यानपिढ्या या समाजाला स्थलांतरित होऊन राहावे लागते.

आंदेशे येथील कातकरी वस्तीसाठी पंचायत समिती आणि रेलफॉर फाउंडेशनच्या पुढाकारातून गृहनिर्माण प्रकल्पाचा पहिला प्रयोग या बांधवांसाठी राबविला जात आहे. त्यामुळे कातकरी परिवाराच्या जीवनात एक आशेचा किरण उभा राहिला आहे. यापूर्वी रेलफॉरच्या माध्यमातून ९ सदनिका बांधून दिल्या होत्या. आता ११ सदनिका बांधल्या जाणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कंधारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, उद्योजक आबासाहेब शेळके, पौडचे सहायक फौजदार बाठे, पंचायत समिती प्रतिनिधी अमोल पटेकर, आंदेशेचे उपसरपंच सागर
भालेराव, सदस्य शंकर बाबर, किशोरी अग्निहोत्री, रूपाली भापकर, देवराम कंधारे, सूरज भुजबळ व वस्तीवरील आदिवासी बांधव उपस्थित होते.
--------------------------
मुळशी तालुक्यातील एकमेव कातकरी वस्ती अशी असणार आहे, ज्यांना स्वतःच्या जागेसह हक्काची घरे बांधून दिली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११ लाभार्थ्यांना सदनिका बांधून दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी एकूण २० सदनिकांबरोबरच मुलांसाठी अभ्यासिका, बालवाडी, सार्वजनिक हॉल अशीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. - नितीन घोडके, रेलफॉर फाउंडेशन, सीएसआर प्रमुख
--------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT