Rohan Kadu sakal
पुणे

Iron Man : मुळशीच्या भूकरमापकाला बार्सिलोनात आयर्न मॅनचा किताब

पौड (ता. मुळशी) येथील भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक रोहन सीताराम कडू स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत सहभागी झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

पौड - पौड (ता. मुळशी) येथील भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक रोहन सीताराम कडू स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत सहभागी झाले होते. पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे अशी तीन खेळांची मिळून असलेली ही धावती स्पर्धा १४ तास २९ मिनिटांत पूर्ण करून त्यांनी मानाचा आर्यन मॅन किताब पटकावला. जागतिक स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेले रोहन भूमी अभिलेख विभागातून पहिले आयर्न मॅन ठरले आहेत.

मूळचे खेड तालुक्यातील असलेले रोहन कडू हे कोथरूडला परिवारासह राहतात. त्यांनी अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेच्या बॅडमिंटन खेळात सात वर्षे राज्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांना प्रथमपासूनच पोहणे, धावणे, सायकल चालविणे या तिन्ही खेळांमध्ये आवड होती. यापूर्वी कोल्हापूर, डिंभे येथे झालेल्या बर्ग मॅन स्पर्धाही त्यांनी जिंकली होती. गेली चार महिन्यांपासून ते आयर्नमॅन स्पर्धेची तयारी करीत होते. आपली नोकरी सांभाळून ते कसून सराव करीत होते.

बार्सिलोना येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातून २६०० खेळाडू सहभागी झाले होते. त्यांना तिन्ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १६ तासांची वेळ निर्धारित केली होती. रोहन यांनी ३.८ किलोमीटरचे पोहणे १ तास ४१ मिनिटे ४९ सेकंदात पूर्ण केले. ६ तास ५४ मिनिटे ५३ सेकंदात १८० किलोमीटर सायकल चालविली, तर ५ तास ३० मिनिटांत ४२.२ किलोमीटर अंतर धावून पूर्ण केले.

निर्धारित वेळेच्या दीड तास अगोदर स्पर्धा पूर्ण केल्यामुळे त्यांना मानाचा आयर्न मॅन हा किताब बहाल करण्यात आला. या यशातून रोहन यांनी भूमी अभिलेख विभागाचा डंका स्पेनमध्ये वाजविला.

रोहन यांच्या यशाबद्दल भूमी अभिलेखचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते, उपसंचालक अनिल माने, जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, मुळशीचे उपअधिक्षक प्रताप चौधरी यांनी त्यांचा सत्कार केला. आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT