पुणे

ओंबळेवाडीत ग्रामस्थांनी अट्टल चोरट्या पकडले

CD

पौड, ता. ९ : मुळशी तालुक्यातील विठ्ठलवाडीच्या ओंबळेवाडीत घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला ओंबळेवाडी ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने पाठलाग करून पकडले. पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या धरपकडीच्या थरारात चोरट्याकडे एअरगन आणि इतर लोखंडी हत्यारे असतानाही रात्रीच्या अंधारातही पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. इतर तीनजण मात्र पळून गेले. शरद अर्कास काळे (रा. अहमदनगर) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. तारेच्या कंपाउंडला धडकल्याने तो जखमी झाला आहे.

पोलिस दिलेल्या माहितीनुसार, ओंबळेवाडीत बुधवारी (ता.९) पहाटे अडीचच्या सुमारास चार चोरटे गावात शिरले. त्यातील एका चोरट्याने राजेंद्र बापू ओंबळे यांच्या घराच्या पाठीमागून प्रवेश केला. लोखंडी कटरच्या साहाय्याने त्याने घरापाठीमागील दरवाजाचा कोयंडा काढला. कटरनेच लोखंडी खिडक्यांच्या जाळ्या कापल्या. आतल्या खोलीतील लाकडी कपाट उचकटले. ओंबळे यांच्या पँटच्या खिशातून साडेनऊ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पळून चालला होता. तेवढ्यात राजेंद्र यांच्या पत्नी गौरी ओंबळे यांना जाग आली. मागील बाजूने कोणीतरी आत आल्याचा आणि आतल्या खोलीत कुणीतरी असल्याचा त्यांना आवाज आला. त्यांनी राजेंद्र ओंबळे यांना जागे केले. राजेंद्र ओंबळे यांनीही वाडीतील इतरांना फोन करून घरात चोर शिरल्याची माहिती दिली. त्यावेळी गावातील युवकांनी, ग्रामस्थांनी चोरट्यांना गाठले. ग्रामस्थ आल्याचे पाहताच चोरट्यांनी दिसेल, त्या दिशांना धूम ठोकली. ग्रामस्थांनी काळे याचा पाठलाग केला. तो पळत असताना एका तारेच्या कंपाउंडला धडकला. त्यामुळे जबर जखमी झाला. रात्रीच्या अंधारातही धावतपळत ग्रामस्थांनी चोरट्याला पकडले. त्याच्याकडे एअरगनसह घातक लोखंडी वस्तू होत्या. परंतू, ओंबळेवाडीतील युवक ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने त्याला बांधून ठेवले. त्यानंतर युवकांनी पौड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले. जखमी असल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शरद काळे याच्यावर इतर पोलिस ठाण्यातही चोरीचे गुन्हे दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT