पुणे

‘न्याय मिळतेपर्यंत लढा सुरूच ठेवणार’

CD

पौड, ता. २५ : भूमिअभिलेख कार्यालयाच्या चुकीमुळे राहत्या घराच्या जागेबाबत अन्याय होत असल्याने लवळे राऊतवाडीतील (ता. मुळशी) अरुण भिकोबा राऊत हे गेली सतरा दिवसांपासून परिवारासह पौडला उपोषणाला बसले होते. पोलिस प्रशासनाची विनंती आणि आईच्या प्रकृतीचे होत असलेले हाल याचा विचार करून त्यांनी बुधवारी (ता.२५) उपोषण स्थगित केले. मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा चालूच ठेवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राऊत यांच्या लवळे राऊतवाडीतील गट क्रमांक ४१३ मध्ये घर आहे. त्यांच्याच शेजारी गट क्रमांक ४३० ची जागा आहे. काही वर्षांपूर्वी दोन्ही गटनंबरमधील जागांची मोजणी झाली. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाने शेतीचा गटाच्या हद्दीवर शेतकऱ्याचे घर दाखविले. परंतु, हे घर तेथे नसून तेथून काही अंतरावर आहे. असे राऊत यांचे म्हणणे आहे. मोजणी अधिकाऱ्यांनी हद्दीच्या चुकीच्या खुणा दाखविल्या. २००६ ला न्यायालयाने या जागेची मोजणी करण्याचे आदेश मुळशीच्या भूमिअभिलेख विभागाला दिले. त्यावेळी भूमिअभिलेखच्या मोजणी अधिकाऱ्यांनी न्यायालयाची दिशाभूल करीत आपले घर गट क्रमांक ४३० च्या नकाशाची हद्द बरोबर आहे, परंतु या हद्दीवर राऊत यांचे घर नसतानाही केवळ नकाशात दाखविल्यामुळे हा पेचप्रसंग उभा राहिला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. सरकारी नकाशात जागांच्या हद्दी अगदी सरळ दाखविल्या गेल्या आहेत. मात्र मोजणी अधिकारी त्यामध्ये मनमानीपणे बदल करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. पूर्वीपासून जो नकाशा आणि हद्द अस्तित्वात आहे. त्याप्रमाणे निरपेक्ष मोजणी भूमिअभिलेखने करावी. अशी त्यांची मागणी आहे
या मागणीसाठी ९ जूनपासून ते वृद्ध आईसह परिवारासोबत उपोषणाला बसले होते. दरम्यान भोर तालुक्यात भूमी अभिलेख विभागामार्फत जागेची मोजणी करण्यात आली. भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

04153

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT