पुणे

मुळशीत गरजू विद्यार्थिनींसाठी सायकल बॅंक उपक्रम

CD

पौड, ता. 6 : पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिंनींसाठी सायकल बॅंक हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. सायकलचा आधार, भविष्याला आकार या संकल्पनेतून सुरू केलेल्या या उपक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी मुळशी पंचायत समितीने कंबर कसली आहे. तालुक्यातील दानशूर तसेच समाजसेवी संस्थांना सायकली देण्यासाठी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रेय भालेराव यांनी आवाहन केले आहे. दानशूर व्यक्ती, संस्था, कंपन्यांचा सीएसआर निधी या माध्यमातून नवीन सायकली गोळा करायच्या. त्या विद्यार्थिंनींना शिक्षणासाठी वापरावयास द्यावयाच्या. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या गोळा करून दुसऱ्या गरजूंना द्यायच्या असा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. याच उपक्रमाला अनुसरून मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रेय भालेराव यांनी सायकली मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आजी, माजी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कंपन्यांना भेटी देवून त्यांना सायकली देण्यासाठी प्रेरीत करीत आहेत. दानशूरांनी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपल्या गावातील प्राथमिक शाळांमध्ये सायकली द्याव्यात, याबाबत 9404421427 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन भागवत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT