पुणे

मुळशीत अपेक्षित आरक्षणाने अटीतटीच्या लढती

CD

पौड, ता. १३ : मुळशी पंचायत समितीतील सहापैकी हिंजवडी गण वगळता इतर पौड, अंबडवेट, माण, पिरंगुट, भूगाव पाचही गणात अपेक्षित आरक्षण पडल्याने अनेकजण निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. पौड आणि माण गणातून विजयी होणाऱ्या महिलेच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार असल्याने याही गणात चुरस पाहायला मिळेल. तर पिरंगुट, भूगाव सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाल्याने येथेही अटीतटीच्या लढती होणार आहे.
मुळशी पंचायत समितीत पौड, अंबडवेट, माण, हिंजवडी, पिरंगुट, भूगाव हे सहा गण आहेत. नव्याने झालेल्या गण रचनेत भूगाव, अंबडवेट या दोन गणांची नव्याने निर्मिती झाली आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या सहापैकी पाच जागांवर राष्ट्रवादी तर एका जागेवर शिवसेनेचा सदस्य विजयी झाला होता. हिंजवडी गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने श्रीमंत आयटीनगरी असलेल्या या गणातील अनेकांचा पंचायत समिती सदस्य होण्याच्या स्वप्नाचा अपेक्षाभंग झाला. अंबडवेट गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असला तरी कुणबी दाखल्याच्या आधारे विविध पक्षांतील सर्वसाधारण वर्गातील इच्छुक मंडळी प्रथमपासूनच शड्डू ठोकून आहेत. पौड आणि माण या दोन गणांकडे मात्र संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित राहणार आहे. हे दोन्ही गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत. सभापतिपदही याच प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे दोन्ही गणांतील पुरुषमंडळी बायकोच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घालण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. तर पूर्व भागातील आर्थिकदृष्ट्या सधन ओळखल्या जात असलेल्या पिरंगुट आणि भूगाव या दोन गणात अटीतटीच्या लढती अनुभवायला मिळणार आहेत. हे दोन्ही गण सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाल्याने याठिकाणी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गणनिहाय आरक्षण- पौड- सर्वसाधारण महिला, अंबडवेट- नागरिकांचा मागास प्रवर्ग, माण- सर्वसाधारण महिला, हिंजवडी- अनुसूचित जाती महिला, पिरंगुट- सर्वसाधारण, भूगाव- सर्वसाधारण.

मागील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी कॉंग्रेस- ४, शिवसेना- २

प्रमुख समस्या - अर्धवट अवस्थेत असलेला कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग, महामार्गाच्या अर्धवट कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी, अनेक गावांना जोडणारे अंतर्गत रस्त्याचीही अवस्था बिकट, पौड येथे तहसिल कचेरीच्या इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत.

कोणाला धक्का, कोणाला संधी
हिंजवडी गण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने या गणातून विजयी होऊन सभापती झालेल्या कोमल साखरे यांना धक्का बसला आहे. पौड गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने माजी सभापती कोमल वाशिवले यांना पुन्हा संधी निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

SCROLL FOR NEXT