पुणे

भरेफाटा- पौड रस्त्याच्या नूतनीकरणास सुरुवात

CD

पौड, ता. २४ : पुणे ग्रॅंड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने भरेफाटा ते पौड (ता. मुळशी) या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. जिल्हा नियोजनमधून या रस्त्यासह काशिगपर्यंत रस्त्याच्या कामासाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असून, कामालाही सुरुवात झाली आहे.
या रस्त्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्चूनही ग्रहण सुटले नाही. त्यामुळे आता तरी या रस्त्याच्या दुरवस्थेचा वनवास संपणार का? हा मुळशीकरांना प्रश्न पडला आहे. तथापि रस्ता मजबुतीकरणाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे.
तालुक्यातील हिंजवडी, रिहे खोऱ्यातील ग्रामस्थ, कामगार, सरकारी चाकरमाने, विद्यार्थी पौडकडे येण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. तसेच, तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील मुळशी धरण, माले आणि कोळवण खोरे, तसेच कोकणातील नागरिकांना हिंजवडी, पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. चार वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार संग्राम थोपटे यांच्या निधीतून तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्चून हा रस्ता तयार केला होता. दोन वर्षांपूर्वी त्याचे डांबरीकरण झाले. मात्र, ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे काही दिवसांतच हा रस्ता उखडला गेला.
अबंडवेट ते दारवली येथील मरिआई मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बरा होता. मात्र, दारवली येथील मरिआई मंदिर ते पौड या पाच किलोमीटरचे काम निधीअभावी होऊ शकले नाही. त्यामुळे या भागात रस्त्याची मोठी दुरवस्था आहे. खड्ड्यातून वाट काढीत दुचाकी, मोटार चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागते.
मात्र, आता आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील काही रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर झाला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत या रस्त्यांच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उद्दिष्ट आहे.

वाहतूक राहणार बंद
या भागातील वाहतूक काही काळ बंद करणे आवश्यक असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवावी. तसेच, रस्त्यांची रुंदीकरण व मजबुतीकरणाची कामे सुरू असताना स्थानिक लोकांकडून वारंवार अडवणूक होत आहे. या लोकांना शासकीय कामात अडथळा न आणण्याबाबत आपल्या स्तरावरून समज देण्यात यावी, असे पत्र या विभागाने जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

04443

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT