पौड, ता. १२ : विशेष मुलांसाठी अंबडवेट (ता. मुळशी) येथे जिल्हास्तरीय ग्रामीण व शहरी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात निगडीच्या कामायनी शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. संस्कार प्रतिष्ठानच्या विशेष मुलांच्या शाळेतील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १६ शाळांमधील २६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी संस्कारचे विश्वस्त ललित डागा, देवेंद्र चौधरी, महेश देवकर, प्रिती पाटील, प्रत्यय चॅटर्जी, सुरेश विधाते, हृदय भट, राहुल जाधव, पराग पडगिलवार, शशिकांत नांगरे, स्नेहा साठे, आशा खुले, अनिता सोनवणे, जीवनवर्धिनीच्या मुख्याध्यापिका वनिता बारवकर, जीवनज्योतच्या सुनीता सोनवलकर उपस्थित होते. पंच म्हणून अशोक नांगरे, सेवा चव्हाण, ज्ञानोबा फड, प्रशांत गडदे, दशरथ मधे, पी. एस. दुर्गे, संजय पोटफोडे, सुलभा बारवकर, सुप्रिया घटे यांनी काम पाहिले. संस्कारचे संस्थाप्रमुख उल्हास केंजळे, अध्यक्ष डॉ. संतोष देशमुख, सचिव प्रतिभा केंजळे, मुख्याध्यापक मच्छिंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षिका ज्योती पाटील, शार्दूल कुलकर्णी तसेच मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्यांची मुलामुलींची नावे (कंसात शाळा) पुढीलप्रमाणे - ८ ते १२ वर्षे वयोगट - २५ मीटर धावणे - चिन्मय भोसले (पाबळ), मल्हार गवारे (निगडी). २५ मीटर धावणे - शिवन्या कांबळे (लोणीकंद), पुनम कुंभार (शिवणे), क्लब थ्रो- ओम केदारी (सुपे), रुद्र डाके (रस्ता पेठ पुणे). क्लब फ्रॉम - दूर्वा लाड (धायरी), समीक्षा काने (धायरी). हातात कोण घालून बॉल घेऊन येणे - चिन्मय भोसले (पाबळ), पार्थ उत्कर (हडपसर), शिवन्या कांबळे (लोणीकंद), शिद्रा मोमीन (मांजरी), २५ मीटर तीन पायाची शर्यत - अर्णव पवार, साईराज खेडकर (पाबळ), ज्ञानेश्वर चोरगे, कार्तिक कुंभार (शिवणे). कल्याणी ढगे, आराध्या देशमुख (लोणीकंद), कार्तिकी थिगळे, ऋचा कोळी (निगडी), पदन्यास - अंश सरडे (पाबळ), प्रद्युम्न मोरे (मांजरी),कार्तिकी ठिगळे (निगडी), गायत्री राऊत (मांजरी), दिलेल्या वस्तूंचा वापर करणे - ज्ञानेश्वर चोरघे (शिवणे), अर्णव पवार (पाबळ), रितिका शेंडगे (निगडी) , कल्याणी ढगे (लोणीकंद)
१५ ते १८ वयोगट - बाटली क्रमाने गोळा करणे- अमित शेवाळे (शिवणे), आनंद लोखंडे (सासवड), आरती शिवशरण (निगडी), कश्यप नदाफ (शिवणे). पावलांचा खेळ - रोहित सुतार (शिवणे), चिराग ललवानी (निगडी), आरती शिवशरण (निगडी), कश्यप नदाफ (शिवणे), रांगोळी - ऋचा कोळी, श्रीराज नाईक, (निगडी), लक्ष्मण अवचार (पाबळ), तृप्ती शिंदे, सोहम केदार (सासवड).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.