पुणे

मुळशीत उमेदवारीवर ठरणार विजयाचे गणित

CD

बंडू दातीर : सकाळ वृत्तसेवा
पौड, ता. १५ : मुळशी तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी अपेक्षित आरक्षण पडल्याने अनेकांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. इच्छुकांची आणि बंडखोरीच्या तयारीत असलेल्यांची वाढत्या संख्या पाहता यावेळी पक्षापेक्षा उमेदवाराची वैयक्तिक ताकद, चारित्र्य, जनसंपर्क आणि नात्यागोत्यावरच विजयाची मदार अवलंबून आहे.
मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बोलबाला असला, तरी आमदार शंकर मांडेकर यांच्यापुढे पक्षांतर, बंडखोरी रोखण्याचे आणि नाराजांची मनधरणी करण्याचेच कडवे आव्हान असणार आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षही आव्हान निर्माण करत आहे. माजी आमदार शरद ढमाले व संग्राम थोपटे यांच्यामुळे भाजपही सत्तेत शिरकाव करण्याच्या तयारीत आहेत. शिंदे यांची शिवसेना उचल घेण्यासाठी धडपडत असून, ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल पूर्व, पश्चिम पट्ट्यात धगधगत आहे. कॉंग्रेसची ताकद मात्र कमी झाली असून, मनसे अस्तित्वासाठी धडपडत आहे.
मुळशी तालुक्यात पंचायत समितीचे सहा गण, तर जिल्हा परिषदेचे तीन गट आहेत. यापूर्वी दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. त्याखालोखाल शिवसेनेची आपले वर्चस्व टिकविले होते. तथापि राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दुफळी झाल्याने दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली. तर, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे नव्वद टक्के कार्यकर्ते भाजपत गेल्याने कमळाने अचानक भरारी घेतली. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी तालुक्यात सर्वाधिक प्रभावी आहे. त्यात दिड दशकानंतर शंकर मांडेकर यांच्या रूपाने तालुक्याला आमदार मिळाल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठिंब्याने मतदारांच्या जोरावर माजी सभापती महादेव कोंढरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षही आव्हानात्मक काम करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेपोटी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मशाल पूर्व, पश्चिम पट्ट्यात धगधगत आहे. कॉंग्रेसमधील दिग्गजांचा प्रवेश आणि शरद ढमाले व संग्राम थोपटे या दोन माजी आमदारांमुळे भाजपही तालुक्यात उभारी घेऊ लागला आहे. बाळासाहेब चांदेरे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे यांची शिवसेनाही उचल घेण्यासाठी धडपडत आहे. कॉंग्रेसची ताकद मात्र कमी झाली असून, मनसेही अस्तित्वासाठी धडपडत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तालुक्यात बोलबाला असला, तरी इच्छूकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एकाला उमेदवारी देऊन इतरांना बंडखोरी किंवा पक्षांतरापासून रोखणे, तसेच नाराजांची मनधरणी करणे, हे आमदार मांडेकर यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यात महापालिकेप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्यूला आणि सर्वानुमते योग्य उमेदवाराची निवड, हीच सत्तेच्या जयपराजयाची खरी नांदी ठरणार आहे. तर, पश्चिम पट्ट्यात शिवसेनेच्या मशालीचे आणि आयटीनगरीतील भाजपचे आव्हान पेलण्यासाठीही राष्ट्रवादीला कसरत करावी लागेल. त्यात अनेक इच्छूकांनी आपल्या गण, गटातील गावागावात घरोघरी जावून मतदारांच्या गाठीभेटी घेवून स्वतःसाठी वातावरणही तापविले आहे.
पौड आणि माण गणातील विजयी उमेदवार सभापतिपदाच्या सिंहासनावर बसणार असल्याने त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सन २०१७ मधील बलाबल
पंचायत समिती- राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, शिवसेना २,
जिल्हा परिषद- राष्ट्रवादी कॉंग्रेस २ , शिवसेना १

पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण
पौड- सर्वसाधारण महिला, अंबडवेट- नागरिकांचा मागास प्रवर्ग, पिरंगुट- सर्वसाधारण, भूगाव- सर्वसाधारण, माण- सर्वसाधारण महिला, हिंजवडी- अनुसूचित जाती महिला

जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण
पौड- अंबडवेट- नागरिकांचा मागास प्रवर्ग, पिरंगुट- भूगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, माण- हिंजवडी- सर्वसाधारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

municipal elections exit poll 2026 : मुंबईत भाजप-शिवसेना महायुतीच भारी; ठाकरेंचा गड ढासळणार अन् काँग्रेस आघाडीलाही फटका

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting Updates : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान संपले, कोणत्या जागी किती टक्के मतदान झाले?

Municipal Election Result: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी कधी सुरू होणार? सर्वात जलद निकाल कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

पुन्हा एकदा स्त्रियांवरच सिनेमा का केला? केदार शिंदेंचं ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' बद्दल स्पष्ट भाष्य

Rail Tour Package: भाविकांसाठी खुशखबर! आता फक्त १३ हजारांत श्रीशैलम दर्शन; जाणून घ्या रेल्वे टूर पॅकेज

SCROLL FOR NEXT