पौड, ता. २० : मुळशी तालुक्यातील अंबडवेट, दारवली, पौड येथील ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी यांनी ‘पुणे ग्रॅंड टूरचा थरार’ अनुभवला. पारंपरिक वेशभूषा, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवीत, शिस्त आणि उत्साह दाखवीत रस्त्याच्या कडेला उभे राहून जगभरातून आलेल्या स्पर्धकांचे त्यांनी दिमाखात स्वागत केले.
दुपारी दीड वाजता या स्पर्धेला सुरूवात झाली. त्यापूर्वी पोलिसांचा ताफा तसेच संयोजकांच्या दुचाकींची स्पर्धा मार्गावर जाऊन वातावरण निर्मिती केली. पौड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबलचक मानवी साखळी तयार केली होती. विद्यालयातील स्काऊट-गाइड पथक, बीआयएस क्लबच्या पथकाने स्पर्धकांना मानवंदना दिली. इतर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणा देत वातावरणात उत्साह निर्माण केला. विद्यार्थ्यांच्या हातात वेगवेगळ्या देशांचे ध्वज होते. टाळ्या वाजवून घोषणा देत, ढोल-ताशांचा निनाद, हातवर करीत स्पर्धकांचा जोष वाढविण्याचे काम विद्यार्थी, ग्रामस्थांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूलचे चिमुकलेही यांनीही ही जागतिक स्पर्धा पाहिली. दारवली, अंबडवेट परिसरात गावागावातील ग्रामस्थांनी, सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्याकडेला उभे राहून स्पर्धकांना प्रोत्साहित केले. अनेकांनी मोबाइलवर हा क्षण टिपला. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच झपकन वेगाने जाणाऱ्या सायकली पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
स्पर्धामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी साडेदहानंतर भरेफाटा ते पौड आणि पौड ते काशिगपर्यंतची ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. प्रशासनाच्या नियोजनाला ग्रामस्थांनीही सहकार्य केले. तहसीलदार विजयकुमार चोबे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली. मुळशीकरांच्या स्वयंशिस्तीचे उत्साहाचे प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.
4616
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.