पुणे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा ‘सारथी’

CD

पौड, ता. २८ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे गेली २० वर्षापासून अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्या आकस्मित निधनामुळे संपूर्ण पुणे जिल्हा शिक्षण मंडळ परिवार शोकसागरात बुडाला आहे. पवार यांनी गेली दोन दशकात संस्थेला महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीत गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचविले आहे. सर्वसामान्य मराठी कुटुंबाच्या ज्ञानरथाचा सारथी असलेल्या दादांचे संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करण्यासाठी शिक्षणमहर्षी बाबूरावजी घोलप आणि शारदाबाई पवार, अण्णासाहेब आवटे यांनी वर्ष १९४१मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना केली. सप्टेंबर २००६मध्ये पवार यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य त्यांच्या नेतृत्वाने साध्य झाले. संस्थेचा विस्तार प्रामुख्याने ग्रामीण भागात झालेला असून, संस्थेतील माझ्या विद्यार्थ्याला शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्याचा शैक्षणिक व गुणात्मक विकास झाला पाहिजे, ही दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवले. एक लाखांच्यावर विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी संस्थेच्या विविध शाखांमध्ये उपलब्ध केल्या. सर्व शाखांच्या इमारती अद्ययावत सोई- सुविधायुक्त केल्या. नुसत्या भौतिक सुविधांकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठीही त्यांनी जाणीवपूर्वक निर्णय घेतले.
बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ब्रिलियंट स्कॉलर बॅच सुरू केल्या. दहावीच्या निकाल वाढीसाठी संस्था अप्रगत विद्यार्थ्यांकरिता आविष्कार गुणवर्धन उपक्रम, गुणवत्ता वाढ वर्ग घेतला जातो. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय निकषावर आधारित कलचाचणी घेऊन पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या सात वर्षात १०वी, १२वीच्या निकालाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्थेच्या विविध महाविद्यालयांमधून यूजीसी अंतर्गत व पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आधुनिक दर्जाचे विविध अभ्यासक्रम सुरू केलेत. आयुर्वेद महाविद्यालयात एम.डी. पर्यंतचे वर्ग असून, विविध सहा विषयांचे शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे १०० बेडचे आयुर्वेद रुग्णालय व ११५ बेडचे स्टर्लिंग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलही उभारले आहे.

विविध संस्थांशी करार
पवार यांच्या कारकिर्दीत इंग्रजी माध्यमाची प्राथमिक विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये सुरू झाली. आकुर्डी येथे नव्याने सुरू झालेले आर्किटेक्चर महाविद्यालय संस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचे पाऊल ठरले. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, त्यांना इंग्रजी बोलता यावे यासाठी संस्थेचा अमेरिकेतील कॉग्निटिव्ह एक्स्चेंज, कॅलिफोर्निया यांच्याशी करार केला. या करारान्वये संस्थेच्या १५ शाखांतील विद्यार्थी इंग्रजीतून ऑनलाइन संवाद साधतात. त्याचप्रमाणे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपले विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये म्हणून संशोधन केंद्र, कौशल्यधारित शिक्षण, नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले. तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठांबरोबर संशोधन, शैक्षणिक करार केले आहेत. त्याचा विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांना उपयोग होतो.

संस्थेमार्फत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावे, यासाठी संस्थेमार्फत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात असून, जवळजवळ तीन हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी या क्रीडांगणावर आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. त्याचा फायदा संस्थेचे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर, तसेच विद्यापीठ स्तरावर अनेक खेळाडू चमकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT