पुणे

मुळशी तालुक्यात १ लाख ७३ हजार मतदार

CD

पौड, ता. १ : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुळशी तालुक्यात १ लाख ७३ हजार ४०१ मतदार आहेत. माण-हिंजवडी या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या सर्वाधिक ७५, ६५० आहे. पिरंगुट-भूगाव गटाची मतदार संख्या ४९,९२५ तर पौड- अंबडवेटची ४७,८२६ आहे. २२७ मतदान केंद्रात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमल, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार विजयकुमार चोबे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी दिली.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट आणि पंचायत समितीचे सहा गण आहेत. जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी १८ आणि पंचायत समितीच्या सहा जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. पौड-अंबडवेट या जिल्हा परिषद गटात ७४ मतदान केंद्र आहेत. पौड गणात १२,१५४ महिला आणि १३,१६४ पुरुष असे एकूण २५,३१८ मतदार आहेत. या गणात ४४ मतदान केंद्र आहेत. अंबडवेट गणात ३० केंद्र असून १०, ८५९ महिला आणि ११, ६४९ पुरुष असे एकूण २२, ५०८ मतदार आहेत. या संपूर्ण गटात २३,०१३ महिला आणि २४,८१३ पुरुष असे एकूण ४७,८२६ मतदार आहेत.
माण -हिंजवडी गटात ८२ मतदान केंद्र आहेत. माण गणात ३५ केंद्र असून याठिकाणी १३,१६३ महिला आणि १५,४७० पुरुष असे एकूण २८,६३५ मतदार आहेत. हिंजवडी गणात ४७ मतदान केंद्र असून १८,५१९ महिला आणि २८,४९४ पुरुष असे एकूण ४७,०१५ मतदार आहेत. या गटात एकूण ३१,६८२ महिला आणि ४३,९६४ पुरुष असे एकूण ७५,६५० मतदार आहेत.
पिरंगुट - भूगाव गटात ७१ मतदान केंद्र आहेत. पिरंगुट गणात २१ मतदान केंद्र आहेत. याठिकाणी ९१४६ महिला आणि ११,६४८ पुरुष असे एकूण २०७९५ मतदार आहेत. पिरंगुट गणात ५० केंद्र आहेत. याठिकाणी १३,६४२ महिला आणि १५,४८८ पुरुष असे एकूण २९,१३० मतदार आहेत. या गटात २२,७८८ महिला आणि २७,१३६ महिला असे एकूण ४९,९२५ मतदार आहेत. तालुक्यात ७७,४८३ महिला, ९५,९१३ पुरुष आणि तृतीयपंथी ५ असे एकूण १ लाख ७३ हजार ४०१ मतदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT