पुणे

‘झेडपी’, पंचायत समितीसाठी हायटेक प्रचार

CD

पौड, ता. ३ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वत्र डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी समाजमाध्यमाद्वारे प्रचाराची स्मार्ट पद्धत अवलंबली जात आहे. उमेदवारांकडून फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, यु-ट्यूब, ट्विटरच्या माध्यमातून हायटेक प्रचाराची यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात आहे.
उमेदवारांच्या स्वकर्तृत्वाचे वर्णन करणारी उडत्या चालीवरची गाणी आणि रिल्सने तर प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यामुळे एकेकाळी घोंगडी सभा, भिंतीवरील पोस्टर्स किंवा भेळभत्त्यावर चालणारा प्रचार नामशेष होत असून त्याची जागा एआयसारख्या हायटेक यंत्रणेने घेतली आहे.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी संपर्क यंत्रणेअभावी निवडणुकांचा प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारापर्यंत प्रत्यक्ष पोचण्याशिवाय इतर पर्याय नव्हता. त्यावेळी जाहीर सभा, घोंगडी बैठकांवर आणि नात्यागोत्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा उमेदवारांचा आटापिटा चाललेला असायचा. कानाकोपऱ्यात गावोगावी जाताना सर्वांचीच दमछाक व्हायची.
सध्या प्रचारात बदलत्या तंत्रज्ञानानुसार डिजिटल यंत्रणेचा पुरेपूर वापर होताना दिसत आहे. प्रत्येक उमेदवाराने स्वतःच्या कर्तृत्वाचे, कामगिरीचे आणि विकासाच्या व्हिजनचे गाणे तयार करून घेतले आहे. उडत्या चालीवर नृत्याचा संचार करणारी उमेदवारांची गाणी गावोगावी ऐकविली जात आहेत. तसेच वेगवेगळ्या पक्षांचीही पूर्वपरिचित गाणी मतदारांना ऐकायला मिळतात. उमेदवारांच्या प्रचाराच्या तसेच कार्यशैली दाखविणाऱ्या रिल्सने तर प्रचाराचा धुरळा उडाला आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत महिला, पुरुषमंडळी कमी वेळेच्या वेगवेगळ्या शैलीत असणाऱ्या या रिल्स पाहण्यात दंग दिसतात.
काही उमेदवारांनी आपल्या कार्याच्या तसेच व्हिजनच्या स्क्रिप्टही तयार केल्या असून त्यादेखील मोबाइलवर पाहायला मिळतात. पक्षांची, उमेदवारांच्या प्रगतीची, घेतलेल्या निर्णयाची सचित्र माहिती देणाऱ्या डिजिटल स्क्रीन गावोगावी धावत आहे. निरनिराळी स्लोगन वापरून भविष्याचे व्हिजन स्क्रीनवर दाखवून मतदारांना प्रभावित केले जात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मतदारांच्या मोबाइल स्क्रीनवर प्रचार सतत दिसत आहे.
एकंदर नेटकऱ्यांच्या माध्यमातून आधुनिक स्वरूपाचा स्मार्ट प्रचार उमेदवारांकडून सुरू आहे. गावोगावी डिजिटल स्क्रीन, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, यु-ट्युब, ट्विटर या ऑनलाइन यंत्रणेमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेली घटना काही मिनिटात लोकांना कळू लागली.
मोबाइलवरून झालेल्या संपर्काचे रेकॉर्डींग इतरांना ऐकायला मिळू नये यासाठी व्हॉट्सअॅप कॉलिंगचाही प्रकार वाढला आहे. पक्षांतील ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांच्या सभांची भाषणे तळागाळात पोचविण्यासाठी आणि ती कधीही ऐकण्यासाठी यु-ट्युब हे प्रभावी माध्यम ठरले आहे. व्हॉट्स अॅपद्वारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पक्षाची, उमेदवारांची माहिती, व्हीजन, विविध भाषणांचे ऑडिओ, व्हिडिओ, पक्षांची विकाससूत्री आदी माहिती पाठविली जात आहे.

‘एआय’चा वापर
विशेष म्हणजे प्रचारात एआय तंत्रज्ञानाचाही प्रभावीपणे वाढता वापर वाढला आहे. उमेदवारांचे फोटो, आवाज आणि भाषणे अधिक प्रभावी बनवण्यासाठी एआयचा सर्रास वापर होतोय. सोशल मीडियावरून आरोप, प्रत्यारोप गाजत आहे. वेगवेगळ्या आकर्षक सजावटींचे बॅनर, व्हिडिओ या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT